विनयभंगाच्या आरोपीला पोलीसांचा पाठीशी टाकण्याचा प्रयत्न

389

विनयभंगाच्या आरोपीला पोलीसांचा पाठीशी टाकण्याचा प्रयत्न

पीडित महिलेचा पत्रकार परिषदेत आरोप

 

चिमूर/तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील शंकरपूर येथील कृषी केंद्र संचालक महिलेला जवरबोडी येथील एका इसमाने मंगळवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास महिलेच्या मालकीच्या कृषी केंद्रात जाऊन तीन व्यक्तींनी विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिली,याबाबत स्थानिक पोलिसांना तक्रार देवूनही पोलीस या कडे दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोप व मला न्याय द्या! अशी मागणी पत्रकार परिषदेत पीडित महिलेने केली.

सविस्तर वृत्त असे भिशी पोलीस स्टेशन अंतर्गत शंकरपूर येथील स्थानिक चौकीत समाविष्ट असलेल्या शंकरपूर येथे पीडित महिला यांचे मालकीचे सर्वज्ञ कृषी केंद्र आहे.मंगळवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास त्याच्या दुकानात बसल्या होत्या.त्यांच्या दुकानातील कामगार हा भोजन करण्यासाठी घरी गेला होता.त्या एकट्या असताना लगेचच गावाला लागून असणाऱ्या मौजा जवराबोडी येथील इसम कमलाकर ठाकरे व अन्य दोन अनोळखी तोंडाला बांधून असलेले लाल इसम रंगाच्या दुचाकीने त्यांच्या दुकानासमोर आले व कमलाकर ठाकरे हा व्यक्ती दुकानाच्या आत येऊन धारदार चाकू पोटाला लागून अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केला.या बाबात स्थानिक पोलीसाकडे तक्रार व उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे कडे पण तक्रार दाखल केली.

पण या बाबतीत स्थानिक पोलिसांची भूमिका ही आरोपींना पाठीशी घालण्याची आहे.या बाबत आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही असा आरोप स्थानिक पोलीस प्रशासनाने केला व स्वतः वर झालेल्या अन्यायाविरुद्ध असलेल्या आरोपींना पोलिसांनी गुन्हा नोंद करीन तत्काळ अटक करावी अशी मागणी पीडितेने चिमूर येथे आयोजित पत्रकार परीषदेत केली.या वेळी पत्रकार परिषदेला पीडित महिलेसोबत सामजिक कार्यकर्त्या निशा सारंग दाभेकर उपस्थित होत्या.

“सदर प्रकारची लेखी तक्रार प्राप्त झाली असून प्रकरण तपासात आहे.सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.” – प्रकाश राऊत (ठाणेदार)
पोलीस स्टेशन, भिसी

advt