मुलींची सुरक्षितता काळाची गरज, मुलींनो सजग व सावध व्हा – कु. विजया पंधरे

152

मुलींची सुरक्षितता काळाची गरज, मुलींनो सजग व सावध व्हा – कु. विजया पंधरे

 

आर्णी : श्री दत्त प्रसादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित, श्री.म.द. भारती कन्या विद्यालय, आर्णी येथे जिल्हा पोलीस मुख्यालय यवतमाळ येथील “दामिनी पथकाच्या” प्रमुख पीएसआय कुमारी विजया पंधरे मॅडम, यांचा “मुलींची सुरक्षितता” या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या संचालिका सौ. आशाताई प्रियदर्शन भारती मॅडम, प्रमुख अतिथी प्राचार्य श्री रविशेखर कोटावार सर, पर्यवेक्षक श्री प्रेमकुमार नळे सर, सौ. पिस्तूलकर मॅडम, मुख्य शाखेचे उपमुख्याध्यापक श्री दिलीप ननावरे सर, तथा सर्व शिक्षक बंधू – भगिनी आणि वर्ग सात ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आमच्या कन्या शाळेची माजी विद्यार्थिनी आणि आर्णी कन्या असल्याने,आजच्या प्रमुख मार्गदर्शिका कुमारी विजया पंधरे मॅडम यांचा शाळेच्या वतीने, शाल- श्रीफळ व बुके देऊन संस्थेच्या संचालिका सौ. आशाताई भारती मॅडम यांनी यथोचित सन्मान व सत्कार केला. “मुलींनी न घाबरता आपल्यावरील होनाऱ्या अन्यायाचे परिमार्जन केले पाहिजे. मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज असून, मुलींनो सजग आणि सावध व्हा असा मोलाचा सल्ला आपल्या मार्गदर्शनातून कु. विजया पंधरे मॅडम यांनी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज सहारे सर यांनी केले. तर आभार विशाखा समितीच्या सौ.पिस्तुळकर मॅडम यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आणि आयोजनासाठी प्रा. उमेश मोकळे सर, प्रा. प्रफुल मेहर सर, लिपिक श्री किरण पाटील, शिपाई श्री विजुभाऊ नेवारे, श्री संतोष करपते तसेच सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

advt