स्वरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी घेतले कराटे प्रशिक्षण

120

स्वरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी घेतले कराटे प्रशिक्षण

सांगोडा येथे बालोत्सव शुभारंभ

 

बिबी:अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन आवारपूर विद्यार्थांच्या शिक्षणाला नेहमी वाव देत असते हे लक्षात घेता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूरने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सांगोडा येथे बालोत्सव कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवापुरचे उपाध्यक्ष (मा. सं.) गौतम शर्मा, सी. एस. आर. प्रमुख सतीश मिश्रा व सी. एस. आर. टीम चे प्रतीक वानखेडे व सचिन गोवारदिपे तसेच सांगोडा गावचा सरपंचा संजना बोंडे व उपसरपंच ज्योती धोटे व शा. व्य.समिती अध्यक्ष विकास अवताडे, अनील मोहितकर, शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा शेंडे व पो. पाटील सुचिता पाचभाई, केंद्रप्रमुख पंढरीनाथ मुसळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात एकूण एकूण ७२ मुलांनी सहभाग घेतला होता व त्यांना स्वसंरकक्षण साठी कराटे, नुत्य, चित्रकला, हस्तकला व विविध खेळ याचे प्रशिक्षण रत्नाकर भेंडे व त्यांच्या संचांनी दिले. या सोबतच विद्यार्थांच्या मध्यांन भोजनाची व्यवस्था अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर तर्फे करण्यात आली होती. अल्ट्राटेक सिमेंट आवारपूरचे उपाध्यक्ष (मा. सं.) गौतम शर्मा यांनी या कार्यक्रमाचे स्तुती करत या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सोबतच माजी सरपंच सचिन बोंडे आपल्या भाषणातून अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशनचे आभार मानले व असे कार्यक्रम नेहमी आपणाकडून राबविण्यात यावे अशी विनंती केली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शाळेचे शिक्षक राजेश धांडे, रमेश टेकाम, प्रदीप रामटेके सी.एस.आर. टीम चे सदस्य संजय ठाकरे, देविदास मांदाळे, ग्रामपंचायत कर्माचारी व नागरिकांनी सहकार्य केले.

advt