महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा…

0
960

महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा…

बहुजनवादी सामाजिक संघटना तालुका राजुरा तथा राजकीय पक्षांची मागणी

तहसीलदार राजुरा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर ; पोलीस ठाणे राजुरा येथे गुन्हा नोंद करून कडक कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांची मागणी

राजुरा/चंद्रपूर, 12 डिसें. : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील संभाजीनगर येथील कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह व बेताल विधान करून राज्यातील व देशातील ऐक्य, एकात्मता व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने हे वक्तव्य देशविघातक व देशद्रोही असून घटनेतील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.

तीनही महापुरुष भारतातील थोर समाजसुधारक असून त्यांनी केलेले कार्य देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. सध्या राज्यात आरएसएस प्रणित गुंड प्रवृत्तीच्या व्यंक्तींकडून देशातील बहुजन समाजाच्या भावना दुखावण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील वातावरण तापवण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांचे दिसून येत आहे. यामुळे अशा प्रवृत्तीवर आळा घालून एकात्मता अखंडित राखण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, तसेच सामाजिक सौहार्द बिघडल्यास याची सर्व जबाबदारी गैरअर्जदार यांची राहील असा इशाराही पोलीस ठाणे यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी राजुरा शहरातील संविधान चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा पर्यंत मोर्चा काढून निषेध आंदोलन करण्यात आले. पोलीस ठाणे व तहसील कार्यलयात निवेदन देण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी कँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना, RPI गवई गट, भारतीय बौद्ध महासभा (राजुरा, रामपूर, बामणवाडा), गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा, मराठा सेवा संघ राजुरा, नागवंश युथ फोर्स, समता सैनिक दल आदी राजुरा तालुक्यातील सर्व बहुजनवादी सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात हिरीरीने सहभाग घेत निषेध नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here