नाते आपुलकीचे संस्थेने दिला कु.मयुरीस शिक्षणासाठी मदतीचा हात

0
238

नाते आपुलकीचे संस्थेने दिला कु.मयुरीस शिक्षणासाठी मदतीचा हात

कु.मयुरी टेकाम,गोंडपीपरी आक्सापुरातील या विध्यार्थीनीच्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही बारावीच्या परीक्षेत 78% गुण घेत कुंदोजवार महाविद्यालयातुन प्रथम येण्याचा मान पटकावला! आदिवासी कुटुंबातील मुलीने मिळविलेल्या यशाचे अनेकांनी कौतुक केले पण म्हणतात ना पाठीवर थाप देणारे तर बरेच मिळतात पण तिला पुढील शिक्षणासाठी मदत करणारे मात्र कोणी मिळत नव्हते.तिचे वडील *गोविंदा टेकाम* हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि शेती करतानाच आपला संसार चालविण्यासाठी ते दुसऱ्यांच्या शेतावर काम कारण्यासाठी जातात,परिस्थिती हलाखीची असल्याने मयुरीचे कुटुंब हे रोजंदारीचे काम करतात,ज्या वेळेस निकाल लागला त्यावेळेस मयुरी सुद्धा शेतामध्ये रोवणीचे काम करत होती,शेतमजूर आई वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या मयुरिस पुढील शिक्षण घेण्याची जबरदस्त ओढ असतानाही तिच्या परिस्थितीने तिचे भविष्य अधांतरीच होते आणि अशा वेळेस समाजातील आरोग्य व शिक्षण अशा मानव ऊपयोगी गोष्टींवर मदतीसाठी धावून जाणारी संस्था नाते आपुलकीचेने मदतीचा एक हात तिला देऊ केला.
संस्थेचे सदस्य श्री.सतीश बावणे आणि श्री.सचिन बावणे यांनी मयुरिस मदत करण्यासंबंधी संस्थेच्या कार्यकारिणीस प्रस्ताव दिला,मयुरीच्या उज्वल भवितव्यासाठी कार्यकारिणीने कु.मयुरीस पुढील शिक्षण घेता यावे यासाठी मदत करण्याचे ठरवले,त्याप्रमाणे श्री.दिलीप चौधरी सर यांचे छात्रविर राजे संभाजी महाराज कॉलेज ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे ठरले, नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोषभाऊ ताजने,उपाध्यक्ष श्री.किशनभाऊ नागरकर,कोषाध्यक्ष श्री.जयंतदादा देठे,सचिव श्री.प्रा.प्रमोदजी उरकुडे,संघटक श्री.किशोर तुराणकर,श्री.महेश गुंजेकर,श्री.राजेश पहापळे,श्री.मनोहर डवरे, श्री.जितेंद्र मशारकर, श्री.हितेश गोहोकर, सदस्य श्री.संजय गाते, श्री.सतीश बावणे आणि श्री.सचिन बावणे यांनी चौधरी सरांची भेट घेऊन त्यांना मुलीची परिस्थिती लक्षात आणून दिली.मुलीची शिक्षणाची आवड पाहून आणि नाते आपुलकीचे संस्थेच्या विनंतीला मान देऊन श्री.चौधरी सरांनी तीन वर्षासाठी अगदी अत्यल्प दरात मयुरीचे ऍडमिशन करून घेतले, यानन्तर मयूरिच्या कुटूम्बाला तिच्या शिक्षणाबाबत आर्थिक स्वरूपाची चिंता करण्याची गरज उरलेली नाही पुढील 3 वर्षाकरिता ड्रेस पुस्तके लाइब्रेरी 3 वर्षाची 6 सेमेस्टर ची फीस सुद्धा एकत्र संस्थेमार्फत जमा करण्यात आलेली आहे नाते आपुलकीचे कडून तिच्या पुढील शिक्षणासाठी ₹२१३०० ची मदत करण्यात आली.
नाते आपुलकीचे ही संस्था आपल्या मदतीच्या कार्याने अगदी अल्पावधीत एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आली आहे,महत्वाचे म्हणजे या संस्थेचे ३०५ सदस्य असून जे दर महिन्याला केवळ १०० रुपये जमा करून समाजातील अनाथ,गरीब,विधवा,अपंग इत्यादी गरजवंतांना मदतीचा हात देत असतात,संस्थेचा पारदर्शक हिशोब आणि संस्थेने दीड वर्षाच्या काळात जे समाजोपयोगी अनेक उपक्रम राबविले आहेत ते प्रत्येकाला संस्थेच्या https://nateaapulkiche.org या संकेतस्थळावर भेट देऊन पाहता येतील,ही संस्था माणसाने माणसांसाठी माणुसकीच्या नात्याने उभी झालेली ही एक चळवळ झालेली आहे,संस्थेचे सल्लागार उमेश पारखी यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले .


 

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here