आमदार किशोर जोरगेवार यांची कोविड सेंटरला आकस्मिक भेट, जिल्हाधिकारी यांना दुरध्वनीवरुन व्यवस्था सुधारण्याच्या केल्या सुचना
रुग्णांच्या नातलगांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केली जाणार भोजन व्यवस्था
चंद्रपूर येथील कोविड सेंटर बाबतच्या अनेक तक्रारी येत आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी कोणतीही पुर्व सुचना न देता कोविड सेंटरला आकस्मिक भेट देत तेथील वस्तूस्थिची पाहणी केली. यावेळी त्यांनी लगेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत येथील व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सुचना केल्यात. तसेच उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या नातलगांची गैरसोय लक्षात घेता त्यांच्या भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्याचे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेत. त्यानूसार आता उद्यापासून येथील रुग्णांच्या नातलगांच्या भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केली जाणार आहे.