मुबंई येथील डोंबिवलीमध्ये वायुद्ध राष्ट्रीय पंच परीक्षा संपन्न

0
392

मुबंई येथील डोंबिवलीमध्ये वायुद्ध राष्ट्रीय पंच परीक्षा संपन्न

 

प्रत्येक खेळासाठी खेळाडू सोबत पंचही खुप महत्वाचे असतात. खेळाडूंवर कोणताही अन्याय होऊ न देणे तसेच त्यांना योग्य आणि चोख निर्णय देणे हे पंचांचे कार्य असते.
याच गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन, खेळामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी वायुद्ध असोसिएशन ऑफ इंडिया आणि वायुद्ध असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्दमाने डोंबिवली, ठाणे येथे वायुद्ध या भारतीय पारंपरिक खेळाचे शिबिर व परीक्षा पार पडली.

या परीक्षेकरिता देशभरातून एकूण 20 पंचांची निवळ करण्यात आली होती. ही परीक्षा लिखित आणि प्रात्यक्षिक या दोन्ही गोष्टीना अनुसरून घेण्यात आली. जे पंच या दोनही प्रकारात उत्तीर्ण झाले, त्यांची परवानाधारक पंच अशी नेमणूक करण्यात आली.

या परीक्षेचे परीक्षण वायुद्ध रेफरी कमिशन चे मुख्य शुभम बने यांनी केले. शुभम बने यांनी सर्व सहभागी पंचांना खेळाच्या नियमाबद्दल सखोल माहिती दिली तसेच पंचांची परीक्षाही घेतली.

या परीक्षेप्रसंगी वायुद्ध असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव अमित गिरीगोसावी उपस्थित होते. जागतिक वायुद्ध असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मोहिते तसेच महाराष्ट्र वायुद्ध असोसिएशनचे अध्यक्ष विनय बोढे यांनी निवड झालेल्या सर्व पंचांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here