महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या जेष्ठ साहित्यिका विजया पिटके-तत्वादी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार बहाल!

117

महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या जेष्ठ साहित्यिका विजया पिटके-तत्वादी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार बहाल!

 

चंद्रपूर : उपराजधानी नागपूरच्या मायाताई कोसरे व राजूराच्या अधिवक्ता मेघा धोटे मार्गदर्शिका असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्हाॅटसअप गृपच्या सिकंदराबाद येथील जेष्ठ सदस्या तथा सुपरिचित साहित्यिका विजया पिटके-तत्वादी यांना साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.बाबा साहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.हा पुरस्कार डॉ.बाबासाहेब साहित्यिक विचारमंच रत्नागिरीचे वतीने नागपूर येथील आयोजित एका शानदार पुरस्कार सोहळ्यात बहाल करण्यात आला .जेष्ठ साहित्यिका विजया तत्वादी ह्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील मुळच्या रहिवाशी असुन सध्या त्या सिकंदराबाद येथे आपल्या चिरंजिवाकडे वास्तव्याने आहे .गेल्या आठ वर्षांपासून त्या महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या सदस्या असुन त्यांना आता पावतो विविध साहित्य लेखनासाठी बरेच पुरस्कार प्राप्त झाले आहे.अतिशय शांत स्वभावाच्या असणा-या व वयोवृद्ध असलेल्या विजया तत्वादी यांनी प्रेमा तुझा रंग कसा व काव्यात मोती हे कथा संग्रह लिहलेले आहे .मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदरहु पुरस्कार समारंभात त्यांचे उपरोक्त कथा संग्रहाचे प्रकाशन झाले आहे. महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या सदैव प्रेरणेमुळे आपल्याला हा पुरस्कार प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया जेष्ठ साहित्यिका विजया तत्वादी यांनी पुरस्कार समारंभ आटोपल्यावर पत्रकारांशी बोलतांना नागपूरात व्यक्त केली.एका भव्य समारंभात त्यांना सदरहु पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे चेह-यावर सतत आनंद झळकत होता.दरम्यान सहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, मेघा धोटे यांचेसह सहजं सुचलंच्या मुख्य संयोजिका प्रतिभा पोहनकर,सरोज हिवरे, मंथना नन्नावरे, श्रुती उरणकर, रजनी रणदिवे, नयना झाडे , सुषमा घाटे, संगिता चिताडे , कु.सायली टोपकर , सुविद्या बांबोडे ,वर्षा कोंगरे , जागतिक पुरस्कार विजेती कवयित्री अर्चना सुतार,विजया भांगे , सविता भोयर , नंदिनी लाहोळे, स्नेहा उत्तम मडावी, जास्मिन शेख, अल्का सदावर्ते, पुनम रामटेके , आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

advt