पशुपालकांनो मोकाट जनावरांना आवरा

0
353

पशुपालकांनो मोकाट जनावरांना आवरा

विकासाच्या जंगलात जनावरांचा रस्त्यावर बहर…

 

कोरपना प्रतिनिधी
मोठी ग्रामपंचायत असलेल्या नांदा येथील काही पशुपालकांनी गुराढोरांना मोकाट सोडत आहेत. त्यामुळे जनावरे आवारपूर ते गडचांदूर रस्त्यावर आणी नांदा गावातील विविध वार्डात बिनधास्त वावरतांना दिसून येत आहे. तसेच रस्त्यावर दिवसा-रात्री ठाण मांडून असतात. परिणामी अपघातांची शक्यता व भीतीची दाट शक्यता आहे.

हा धोका टाळण्यासाठी पशुपालकांनी आपल्या मालकीच्या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा. तसेच या मोकाट जनावरांच्या रस्त्यावर ठाण मांडून असलेल्या जनावराकडे
हेतुपरस्सर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व कोणत्याही संबंधित कार्यकर्तबगार पुढारी लक्ष देत नसल्यामुळे वाहनधारकांना तारावरच्या कसरतीची मालिका करून घ्यावी लागत आहे. निवळ यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नांदाफाटा सह गावातील मोकाट जनावरांना आवर घालण्यात ग्रामपंचायत अपवाद ठरत आहे.

संबंधित ग्रामपंचायतीने तथा नागरिकांनी मोकाट ज़नावरांचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा जनावरांना कोंडवाड्यात टाकण्याची सूचना सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सदर गडचांदूर ते सांगोडा महामार्गावरील नांदाफाटा व बिबी या गावातील मध्यभागातील हा आवक-जावक रस्ता आहे. या गावातील जनावरे बिनधास्त मोकाट असल्याने अनेकदा वाहतूक करणारि वाहने जनावरांना स्त्यावर चिरडले आहे. सांगोडा ते गडचांदूर या सांगोडा, अंतरगाव, सोनुलीँ, विरूर, खैरगाव, इरई, बोरगाव, गाडेगाव, वनोजा, हिरापूर, आवारपूर, कढोली, पालगाव आदी नागरिक या रस्त्याने गडचांदूर शहरात विविध शासकीय कामे, शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गडचांदूर शहरात पोलीस ठाणे, बँकेच्या कामासाठी आदी या शहरातील विविध कामाच्या निमित्ताने या रस्त्याने ये-जा असते. विध्यार्थ्याची आणी नागरिकांची झुंबड याच रस्त्याने गडचांदूर शहराकडे रोज ये-जा असते. या रस्त्यावर या विकासाच्या जंगलात जनावरांचा रस्त्यावर बहर असल्याने अपघातास खुले आमंत्रण मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here