शेताच्या कुंपणाला जोडलेल्या विद्युत तारांचा करंट लागून तरुणीचा मृत्यू

0
800

शेताच्या कुंपणाला जोडलेल्या विद्युत तारांचा करंट लागून तरुणीचा मृत्यू

मनोज नवले, वणी (०७ ऑगस्ट) : यवतमाळ जिल्हाचे वणी तालुक्यातिल घटना शेताला केलेल्या ताराच्या कुंपणाला जिवंत विद्युत तारा जोडल्या गेल्याने कुंपणाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असल्याने. या कुंपणाच्या तारांना नकळत स्पर्श झाल्याने एका तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना तालुक्यातील बोर्डा शेत शिवारात आज ७ ऑगष्टला पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली. कु. रमय्या परस्ते असे या विजेच्या धक्क्यान मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. मृत मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेतमालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

बोर्डा या गावातील नितीन विजय ढेंगळे (३७) यांच्या शेतात शेतमजूर म्हणून मध्यप्रदेशातील एक कुटुंब वास्तव्यास आहे. शेतात मजुरी करून शेतातील बंड्यावरच या कुटुंबाचं राहणं आहे. सध्या शेतातील पिकं डौलावर असून जंगली जनावरांकडून पिकांची नासधूस होऊ नये, याकरिता काही शेतकरी शेताभोवती केलेल्या ताराच्या कुंपणाला विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह संचारत असल्याने जंगली जनावरांना शेतात प्रवेश करता येत नाही. जंगली जनावरांपासून पिकांचं संरक्षण करण्याकरिता शेतकरी या पद्धतीचा अवलंब करतात. पण जनावरापासून संरक्षणाकरिता लावलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतमजूर तरुणीचा हकनाक बळी गेला. कुटुंबातील रमय्या परस्ते (१९) या मध्यप्रदेशातील शेतमजूर तरुणीचा जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला.

 

पहाटे प्रातःविधीसाठी गेलेली तरुणी खुप वेळ होऊनही परत न आल्याने तिच्या मामाने तिचा शोध घेतला असता, ती नितीन ढेंगळे यांच्या शेतात निपचित पडून दिसली. तिच्या बाजूला जिवंत विद्युत तार पडून दिसली. त्यामुळे विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने भाचीचा मृत्यू झाल्याचा मामला संशय आला. मामाने शेतमालकाला याबाबत माहिती देत सदर प्रकरणाबाबत पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. मृतीकेचे मामा दीपचंद धर्मसिंग मरकाम (२६) रा. खमरिया ता. शहपुरा जि. डिंडोरी (म.प्र.) यांच्या तक्रारीवरून शेतमालक नितीन विजय ढेंगळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३०४(ii) २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आनंदराव पिंगळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here