आई – वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांची दिवाळी आनंदात साजरी

0
388

आई – वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांची दिवाळी आनंदात साजरी

राजुरेड्डी यांच्या भेटवस्तूनी चिमुकल्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

 

 

घुग्घुस : दिवाळी हा दिव्यांचा सण भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव देशाला आपल्या तेजाने उजळून टाकणाऱ्या आनंददायी उत्सवामुळे लोक आनंदीत होऊन आपल्या घरांची साफसफाई करून रंगरंगोटी करतात दिव्यांची व विद्युत रोषणाई करतात कुटुंबातील सदस्यां करीता नवीन कपडे भेटवस्तू घेतात फराळ केल्या जातो मिष्ठान्न आणल्या जाते व मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केल्या जाते.

तर दुसरीकडे समाजात असे ही चिमुकले आहेत दुर्दैवाने ज्यांचे आई व वडिलांचे छत्र हरविले असून त्यांच्या जीवनात सर्वत्र अंधारच पसरले आहेत. त्यांच्या अंधारमय जीवन प्रकाशित करण्याचा प्रयास काँग्रेस तर्फे करण्यात येत आहे.

घुग्घुस शहरातील शांती नगर येथील तक्कला कुटुंबातील पती व पत्नी विद्युत धक्क्याने मरण पावले त्यांच्या पश्चात सात वर्षाची मुलगी व पाच वर्षाचा मुलगा पोरका झाला अमराई वॉर्डात माने कुटुंबातील पती – पत्नीचे ही अत्यंत धक्कादायक पध्दतीने मृत्यू झाला त्यांचे पाच व दोन वर्षाचे मुलं पोरके झाले या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट असून यांचे उदरनिर्वाह म्हातारे आजी – आजोबा कसे तरी करीत आहे.
या मुलांची दिवाळी अंधारात जाऊ नये याकरिता काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने नवीन कपडे,मिठाई,फटाके, फळ, विविध प्रकारचे बिस्कीट, चिप्स, तोश व अन्य धान्याची मदत भेट स्वरूपात करण्यात आली.

यामुळे चिमुकल्याच्या चेहऱ्यावर हसू आणि आजोबा – आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख,रोशन दंतलवार,रोहित डाकूर, दीपक पेंदोर,रफिक शेख,सुनील पाटील,अमित सावरकर, साहिल सैय्यद, हरीश कांबळे,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here