ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या रंगात रंगली दिवाळी या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ठाणेकर नागरिकांशी संवाद साधला !!

221

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या रंगात रंगली दिवाळी या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ठाणेकर नागरिकांशी संवाद साधला !!

 

 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ठाणे: गेली दोन वर्षे अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत घालवल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आपण सगळे सण निर्बंधमुक्त वातावरणात साजरे करत आहोत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर आता दिवाळी चा सणही मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय याबाबत समाधान व्यक्त केले. तीन महिन्यांपूर्वी राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर लोकांना केंद्रस्थानी मानून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतल्याचे सांगितले. हे सर्वसामान्य लोकांचे सरकार असून त्यांच्यासाठी हे सरकार कायमच कटिबद्ध राहील अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.

यावेळी ‘रंगाई’ या खास दिवाळी अंकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते शरद पोंक्षे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, आयोजक दिगंबर प्रभू, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार आणि कार्यक्रमातील सर्व गायक, वादक, कलाकार आणि ठाणेकर नागरिक उपस्थित होते.

advt