अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे इच्छूक उमेदवार निवडणुकीपासून वंचित

0
397

अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे इच्छूक उमेदवार निवडणुकीपासून वंचित

कविता प्रमोद भगत जि. प.सदस्यांसह अनेक माजी सरपंचाचा आरोप

चामोर्शी तालुक्यातील ग्रा. पं. निवडणूकीचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना दररोज नवनवीन शासन निर्णय काढून नको त्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी अटी घालून सामान्य इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांनी बेत आखल्याचा आरोप जि. प.सदस्य कविता भगत यांच्या सह अनेक गावातील माजी सरपंचानी 1 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे.
ते म्हणाले की शपथ पत्राकरीता एकमेव टेबल असल्याने उमेदवारांना वेळेवर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास अडचण निर्माण होत आहे. कारण नसताना मतदार यादीतील अनुक्रमांक याची सत्यप्रत मागविले व ति देण्यासाठी एकमेव टेबल असने, त्यासाठी अर्ज केल्यानंतर ती प्रत मिळण्यासाठी दोन दोन दिवस लागत असल्याने उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुद्रांक (स्टॅम्प) चा तुटवडा असून मुद्रांक व कोर्ट तिकीटाची अवाजवी रक्कम घेऊन आर्थिक लूट केली जात आहे. मुद्रांक विक्रेत्याबाबत महसूल प्रशासनाकडून कोणतेही माहिती फलक लावल्या गेल्या नसल्याने मुद्रांकासाठी तहसील कार्यालयापासून १किमी.अंतरावर धाव घ्यावी लागत आहे. या प्रकारची माहिती उमेदवारांनी तहसीलदारांना दिली असता त्यांनी लेखी तक्रार देण्याचे सांगून कानाडोळा केल्याचा आरोप यावेळी माजी सरपंचानी केला .
निवडणुकीत मागासवर्गीयांच्या राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत काढलेल्या परिपत्रकात कोणतेही जावक क्रमांक व दिनांक यांचे उल्लेख दिसत नाही यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास उमेदवारांची धांदल उडाली आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर नाकारने वेगवेगळ्या टेबलावर वेगवेगळे निवडणूक अधिकारी असल्याने वेगवेगळे नियम व अटी उमेदवारांवर लादून कागदपत्रांची पुर्तता केल्याशिवाय नामनिर्देशन पत्र स्विकारण्यास तयार नाहीत तसेच ग्रामसेवकाद्वारे शौचालय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ निवडणूक अधिकारी घोषणापत्र घेण्यास तयार नाहीत. यासह तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार ३ वाजता बंद करीत तहसील मध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना आतमध्ये जाण्यासाठी मज्जाव घातला जात आहे. तहसीलदार यांना भेटण्यास लोकप्रतिनिधींना मज्जाव केल्या जात आहे. त्यामुळे लोकशाही घातक लावलेल्या अटी रद्द करून सर्व नामनिर्देशन पत्र स्वीकारावे व दोन दिवस मुदत वाढ देवून इच्छूक उमेदवारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला जि. प.सदस्य कविता भगत, माजी पं.स.सदस्य प्रमोदभाऊ भगत ,माजी सरपंच भाविका देवतळे, सुषमा आभारे, दिगांबरभाऊ धानोरकर, संजय दुधबळे,सुभाष कोठारे, प्रमिला बैस, विभा कोठारे, मनिषा मंगर, सारिका आभारे, प्रेम सिंग बैस, रामचंद्र सातरवार, लोमेश भगत, विवेक भगत आदी उपस्थित होते.

आयोगाच्या निर्देशानुसारच प्रक्रिया:- तहसीलदार.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आकाश अवतारे यांच्याशी संपर्क🗣📲📞 साधला असता अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने गर्दी वाढत होती मान्य करतो परंतु निवडणूक प्रक्रिया राबविण्यास विलंब होत होता हे आरोप चुकीचे असून निवडणूक आयोगाने दिलेल्या अटी व शर्ती चे योग्य ते पालन करुन निवडणूक प्रक्रिया पार पाडीत असल्याचे तहसीलदार अवतारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here