भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या – आ. डॉ. मनीषा कायंदे

0
492

भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या – आ. डॉ. मनीषा कायंदे

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार

 

 

नागपूर : भंडारा जिल्ह्यात असाहाय महिलेवर मदतीच्या बहाण्याने तिघांनी सामुहिक अत्याचार करून निर्वस्रावस्थेत तिला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या व घरगुती भांडणातून माहेरी बहिणी सोबत राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेस भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेऊन तिघांनी बलात्कार केला, त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पीडित महिला अत्याचारामुळे व प्रचंड रक्तस्राव झाल्याने बेशुद्धाअवस्थेत आहे. सध्या तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर घटना ही दिल्लीतील निर्भया घटने सारखीच आहे.

या घटनेनंतर पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचे आदेशाने शिवसेनेच्या आ. डॉ. मनीषा कायंदे, सुषमा अंधारे व प्रवक्त्या संजना घाडी यांच्या शिष्टमंडळाने आज 7 ऑगस्ट रोजी नागपूरच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पीडीतेच्या प्रकृतीची व तिच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. नागपूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.सुधीर गुप्ता यांची भेट घेऊन पीडीतेची योग्य काळजी घेण्याची विनंती केली.

त्यानंतर नागपूर – गडचिरोली विभागाचे विशेष महा निरीक्षक श्री संदीप पाटील यांची भेट घेऊन तपासाबाबत माहिती घेतली व काही सूचनावजा मागण्या करण्यात आल्या.

1) सदर पीडीतेला शासनाच्या मनोधर्य योजनेतून तातडीने आर्थिक मदत व समुपदेशन करण्यात यावे.

2) आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.

3) सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून पीडीतेला तात्काळ न्याय देण्यात यावा.

4) भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here