नवराज जुनघरे यांच्या घरासमोरील खड्डा ठरत आहे जीवघेणा
खड्डा भुजवावा यंग ब्रिगेड घडोलीची मागणी

घडोली येथील गावातील मुख्य मार्गावरील नवराज जुनघरे यांच्या घरा समोरील पुलियावर खड्डा पडलेला आहे.
परतीच्या पावसामुळे गावातील अनेक रस्ते खराब झाले आहे. हा खड्डा चुकवून अनेक अनेकांना वाहने चालवावी लागत आहे. तर पायी चालताना सुद्धा अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पडलेला खड्डा हा निकृष्ट कामाची पोचपावती असून जीवघेणा खड्डा लवकरात लवकर ग्रामपंचायत ने भुजवावा अन्यथा यंग ब्रिगेड तर्फे आंदोलन करू असा इशारा यंग ब्रिगेड शाखा घडोली च्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.