रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

0
621

रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत असलेले घाणीचे साम्राज्य व विविध समस्यांचा तातडीने निपटारा करा…!

 

 

गडचांदूर/कोरपना, ५ ऑक्टो. : ३० सप्टेंबरला रात्री नऊ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिकेला (एम एच १४ सी एल ११५७) अपघात झाला. यात बैलमपूर येथील रहिवासी कल्याणी सुभाष तेलतुंबडे (४७), लक्ष्मीकांत सुभाष तेलतुंबडे (२३) यांचा मृत्यू झाला. मृतकांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच राज्यात रुग्णवाहिका चालवण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीवर व त्या रुग्णवाहिका चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून केली आहे.

रुंगालाय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण छतामधून पाणी गळते. यामुळे येथे असलेला औषध साठा खराब होण्याच्या अवस्थेत आला आहे. या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना उपचाराकरिता चंद्रपूर येथे सातत्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात येते. त्यामुळे येथे परिपूर्ण स्टाफ उपलब्ध करून देण्यात यावा. अशा विविध मागण्या प्रामुख्याने निवेदनातून करण्यात आल्या.

ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथील इमारत करोडो रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आली. मात्र अल्पावधीतच हि इमारत जीर्ण अवस्थेत आल्यामुळे इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून विविध समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा असलेल्या गडचांदूर येथे सुसज्ज इमारत व रुग्णांना उपचाराच्या योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शाखा कोरपनाच्या वतीने गडचांदूरचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा वैद्यकीय अधिकारी जिल्हा कार्यालय चंद्रपूर यांना तालुका अध्यक्ष मधुकर चुनारकर यांच्या नेतृत्वात आज निवेदन पाठविण्यात आले.

सदरील मागण्या तातडीने दहा दिवसांत पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा वंचित बहुजन आघाडी शाखा कोरपना च्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. आणि होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सदर निवेदनातून देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here