पंचशील वॉर्डातून मोटरसाईकल चोरी

0
527

पंचशील वॉर्डातून मोटरसाईकल चोरी

पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांचे आव्हान ; दिवसाच्या चोरीमुळे भीतीचे वातावरण

 

राजुरा : शहराच्या मध्यभागी असलेल्या पंचशील वॉर्डातील अण्णाजी पाचभाई यांच्या घरी किरायाने राहणारे विनोद बोंसुले यांची मोटरसाईकल दुपारी दोन वाजता घरासमोरून चोरट्यांनी पळवून नेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.

राजुरा शहरात यापूर्वीही मोटरसाईकल चोरीच्या घटना घडल्या आहे. आज (दि. १४) दुपारी दोन वाजता बालाजी कापड केंद्राच्या मागच्या बाजूला पंचशील वॉर्ड येथे किरायाने राहत असलेले विनोद बोंसुले यांची मोटरसाईकल क्रमांक MH 34 BJ 5306 घराबाहेर ठेवून होती, विनोद वेकोली मध्ये कामगार असून दुसऱ्या पाळीत कामावर जाण्यासाठी घराबाहेर निघाले असता मोटारसायकल दिसत नसल्याने आजूबाजूला मोटरसाईकलचा शोध घेतला मात्र मोटरसाईकल दिसत नसल्याने आपली मोटरसाईकल चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने राजुरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली.

शहरात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढत असताना आता तर चोरट्यांनी दिवसाच मोटरसाईकल चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या पंचशील वार्डातून मोटरसाईकल चोरी गेल्याने चोरटे किती सक्रिय आहे हे यावरून दिसून येत आहे. यापूर्वीही शहरात मोटरसाईकल चोरीच्या घटना घडल्या असून आज तर चोरीट्यांनी पोलीस प्रशासनासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here