रामदेगी- संघारामगिरी मोकळी करा अन्यथा ताडोबा पर्यटन बंद पाडू : प्रा. जोगेंद्र कवाडे

0
637

रामदेगी- संघारामगिरी मोकळी करा अन्यथा ताडोबा पर्यटन बंद पाडू : प्रा. जोगेंद्र कवाडे

गुजगव्हांन ते (संघारामगिरी) रामदेगीत निघाला “क्रांती मोर्चा”

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो बौद्ध अनुयायीची हजेरी

तालुका प्रतिनिधी/आशिष गजभिये

चिमूर । रामदेगी- संघरामगिरी येथील धार्मिक स्थळावर वनविभागाकडून लादण्यात आलेले निर्बंध हटवून सर्व समाजबांधवांना प्रवेश निशुल्क द्यावा. अन्यथा आगामी काळात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प पर्यटकांकरिता बंद पाडू असा इशारा मोर्च्याला संबोधित करताना माजी आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दिला. पुढे बोलताना प्रा.कवाडे म्हणाले की समाजविघातक वनाधिकारी यांना निलंबित करावं अशी मागणी करीत आगामी काळात मागण्या पूर्ण न झाल्यास समाजबांधवांनी एकजूट होऊन आंदोलन उभारण्याच आवाहन केलं.

या वेळी मोर्च्या ला संबोधित करताना वंचित चे राज्य महासचिव राजू झोडे यांनी वनविभागाच्या समाजकंटक अधिकारर्यांचा निषेध करीत राज्यात केंद्र सरकारच्या वनकायदा २००६-२०१० अधिनियमाची अंमलबजावणी करावी संघरामगिरी-रामदेगी येथील भाविकांची पिळवणूक बंद करा अशी मागणी केली.

विदर्भातील काशी समजणारे संघारामगिरी (रामदेगी) हे बौद्धाचे प्रेरणास्थान तर हिंदू धर्माचे श्रद्धास्थान आहे. येथे मागील 30 वर्षांपासून बौद्ध धर्मगुरू जंगल भाग व पहाडावर दऱ्या -खोऱ्यात एकांतवासात बसून तप (अधिष्ठान) करीत असतात. नंतर जवळच्या परिसरात बौद्ध धर्मगुरू समाजामध्ये धर्माचा प्रसार करून तथागत गौतम बुद्धाच्या शिकवणीच्या आष्टगिक मार्ग व पंचशीलचे तत्त्वाचे मार्गदर्शन बौद्ध अनुयायांना करीत असतात. या ठिकाणी दुरदुरुन पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊन तथागताला व महामानवाला नतमस्तक होत असतात. मात्र मागील अनेक वर्षांपासून संघारामगिरी येथे बौद्ध धर्मगुरूना वनविभाग (बफर) हे बौद्ध विहारात जाऊं देण्यास सक्त मनाई करीत होते. त्यामुळं बुद्धांनी शिकवण देण्याऱ्या तथगताच्या शांतीदूतांनी आपला तप (अधिष्ठान) कुठं करायचा याबाबद्द वनविभागा विरुद्ध रोष निर्माण होत होता. त्यामुळं वनविभाग (बफर) यांनी गेट खुले करावे. याकरिता आज 12 फेब्रुवारीला गुजगव्हांन ते संघारामगिरी पर्यँत पायदळ मार्च बौद्ध धर्मगुरू भिख्खू संघ व बौद्ध अनुयायीच्या हजारोंच्या उपस्थितीत वनविभागाच्या गेट पर्यँत धडकला.

यावेळी पोलीस विभागणी मोर्चा हा वनविभागाचे गेट जवळ अडवला व त्याचे रूपांतर एका सभेत झाले असून, यावेळी मंचावर बौद्ध धर्मगुरू महाथेरो ज्ञानज्योती उपस्थित होते. त्यांनी क्रांती म्हणजे काय याबाबद्द सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तथागत गौतम बुद्धाला मान्यवर मंडळी नतमस्तक होऊन पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी मंचावर विधानपरिषद सदस्य आमदार जोगेंद्र कवाडे सर, राजू झोडे, ऍड सुलेखा कुंभारे, जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूरकर, प्राध्यापिका कमलाताई गवई, वर्षा श्यामकुळे, आदिवासी ब्रिगेडचे नेते पेंदाम, रामदेगी देवस्थानचे अध्यक्ष नारायण कारेकर, ईश्वर घानोडे, गोविंद महाराज, प्रहार सेवक शेरखान पठाण, ऍड. अनंता रामटेके, नागपूरे, ईत्यादी मंचावर उपस्थित होते.

यावेळी प्रास्तविक करतांना भन्ते धम्मचेती यांनी सांगितले की, जिथे भंतेजी असतात तिथे मोर्चा हा शांततेतच होत असतो. पण जिथं शासनानालाच कायद्याचे विसर होत असते. तर त्यावेळी आम्हला सुद्धा कायदा बाजूला सारून नामविस्तार करिता जशी क्रांती झाली तशीच क्रांती आम्हला करावं लागेल. यामुळं सरकारने आम्हचा पेय पाहू नये असे यावेळी सांगितले. रामदेगी संघारामगिरी येथे जाण्यासाठी पर्यटकाकडून 4 हजार रुपये वसुली करीत असल्याच सांगीतल. संघारामगिरी हे सम्राट अशोका पासून जुळलेली भूमी आहे. आजही सम्राट अशोकाच्या काळात असणाऱ्या विहिरी सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी आजही असल्याचं सांगितलं.

अन वनाधिकारी झाले गायब मोर्चेकर्यांनी गेट उघडल्याशिवाय हटणार नाही असा एल्गार करताच वनविभागाचे प्रतिनिधी असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी-कर्मचारी मोर्चा स्थळावरून गायब झाले असल्याचं चित्र निदर्शनास आलं. तर वनविभागाचे कर्मचारी वनपरिक्षेत्र अधिकारी आलेच नसल्याचं सांगितलं.

अन उपविभागीय पोलीस अधिकारी हात जोडून झाले नतमस्तक चिमुरचे पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन बगाटे यांनी संघारामगिरी येथील हजारो बौद्ध अनुयायांचा मोर्चा पाहून मोर्चा शांततेत व्हावा याकरिता बौद्ध बांधवांसमोर दोन्ही हात जोडून विनंती केली.

गेट सुरु करण्याबाबद्द बौद्ध अनुयायी यांनी गेट आताच सुरु करण्याबाबद्द हट्ट धरला होता. मात्र पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन बगाटे यांनी बौद्ध धर्मगुरू यांना आठ दिवसाचा अल्टीमेंटम मागितला. या आठ दिवसात वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा करू असे यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन बगाटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here