शिक्षक व कर्मचाऱ-यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतुनच व्हावे!
कवडू लोहकरे यांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

विकास खोब्रागडे
चिमुर : सध्याच्या परिस्थितीत जि. प. शिक्षक, खाजगी शिक्षक व इतर कर्मचा-यांचे पगार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत होत आहे. कर्मचा-यांचे पगार कोणत्या बँकेत असावे? याबाबत संभ्रम शिक्षक कर्मचारी यांच्यात निर्माण झाला होता. शासन निर्णय ३१ आॅगस्ट २०२० परिपत्रक निर्गमित करण्यात आले. आपले वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथुन काढुन राष्ट्रीयकृत बँकेत असावे अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.
राष्ट्रीयकृत बँक प्रमाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संरक्षण कवच, विमा, सँलरी पँकेज, होम लोन, वैयक्तिक लोन सुविधा देऊ शकत नाही. त्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँक सर्वच सुविधा देण्यास तयार आहे. त्यामुळे सर्व सोयी सुविधा देणारी एकमेव राष्ट्रीयकृत बँक असुन त्याच बँकेत जिल्हा परिषद शिक्षक, खाजगी शिक्षक व इतर कर्मचारी यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतुनच करण्याची मागणी राष्ट्रीय ओ बी सी कर्मचारी अधिकारी महासंघ कोषाध्यक्ष – कवडू लोहकरे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचेकडे करण्यात आली.
“आपले पगार कोणत्या बँकेतुन व्हावे? हा आपला निर्णय आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्मचारी वर्गाचा कल वाढला आहे.” – कवडू लोहकरे
कोषाध्यक्ष- राष्ट्रीय ओ बी सी कर्मचारी अधिकारी महासंघ चिमुर