मराठा सेवा संघातर्फे ओमचा सत्कार

0
385

मराठा सेवा संघातर्फे ओमचा सत्कार

 

राजुरा– मराठा सेवा संघ, शाखा राजुरा तर्फे ओम सचिन वऱ्हाटकर यांचा त्यांच्या राहत्या घरी जाऊन पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराच्या वेळी ओमचे आई-वडील व आजी-आजोबा उपस्थित होते. ओमने 10 व्या वर्गात (CBSE Pattern) 99 टक्के गुण घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्याने इंग्लिश व सोशल सायन्स या विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहे. तो जवाहर नगर, राजुरा येथील निवासी आहे. तो स्टेला मारीस कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आहे.

त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक यांना दिले. पुढे स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे ध्येय त्याने निश्चित केले आहे.

ओमचा सत्कार करण्यासाठी मराठा सेवा संघ, शाखा राजुराचे दिनेश पारखी, दत्तात्रय मोरे, वामन साळवे, मधुकर मटाले, चंद्रकांत भोयर आणि वैभव अडवे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here