तब्बल तीस तासापासून खडसंगी अंधारात

0
388

तब्बल तीस तासापासून खडसंगी अंधारात

वीज उपकेंद्र ठरतोय शोभेची वास्तू

विजेची समस्या कायमच

 

आशिष गजभिये/चिमूर
तालुक्यातील खडसंगी सह परिसरातील २२ गावांना विजेचा पुरवठा करणारे वीज वितरण उपकेंद्र शोभेची वास्तू ठरत आहे.पावसाची एक झळक आणि रात्र भर लाइट बंद ही समस्या कायमस्वरूपी असून बुधवारी झालेल्या अल्पशा पावसातच वीज वितरण कंपणीच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. चक्क वीज वितरण उपकेंद्राचे मुख्यालय वृत्त लिहिस्तोवर अंधारातच होते.

बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास पासून पावसाला सुरुवात झाली १०-१५ मिनिटांच्या पावसातच वीज गेली तेव्हापासून तर खडसंगी गाव तब्बल ३० तासापासून अंधारात आहे. विजेच्या वारंवार निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन खडसंगी परिसरातील जनतेच्या सेवेसाठी आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या पाठपुराव्याने पाच वर्षांपूर्वी खडसंगी व परिसरातील २२ गावांच्या सेवेसाठी वीज उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. पण वीज वितरण कंपनीच्या वेळेकाढेपना धोरणामुळे अद्यापही पूर्वीसारख्याच विजेच्या समस्या कायम आहे.

खडसंगी उपकेंद्राला ला चिमूर व शेगाव फिडर वरून वीजपुरवठा होतो राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शेगाव च्या लाईट मध्ये बिघाड निर्माण झाला याला तीन वर्षांचा कालावधी होऊनही आद्यपही सुरू झालेला नाही.चिमूर वरून येणाऱ्या पुरवढ्यात विविध समस्या कायम निर्माण होत असतात.या कडे अधीकारी व कर्मचारी वेलकाढेपणा धोरण अवलंबून काम करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

 

विजेवर आधारित व्यावसायिकांची उपासमार
परिसरातील गावात निर्माण होणाऱ्या विजेच्या समस्या मुळे वीजेवर आधारित व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असते.तब्बल तीस तासापासून बंद असलेल्या वीज पुरवढ्याने अनेक आईस्क्रीम, दूध, दही ,झेरॉक्स, इंटरनेट कॅफे, मिनी बँक व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

दोषी कर्मचारी-अधिकारी यांचेवर कारवाई करा
“उपकेंद्र निर्मानाधीन काळापासून परिसरात वीज समस्या कायम आहेत. अधिकारी -कर्मचारी मुख्यालयी राहत नसून वेलकाढेपणा धोरण अवलंबिले जाते. दोषी कर्मचारी यांचे वर कार्यवाही करून पर्यायी शेगाव फिडर त्वरित सुरू करण्यात यावं अन्यथा आंदोलन करण्यात येणार.” – रोशन बन्सोड
तालुका महामंत्री, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, चिमूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here