बफर क्षेञातील समस्याविरोधात जनआक्रोश आंदोलन

0
384

बफर क्षेञातील समस्याविरोधात जनआक्रोश आंदोलन

 

 

विशेष प्रतिनिधी/पंकज रामटेके
भाजपा चंद्रपूर तालुका व भाजपा आदिवासी आघाडी चंद्रपूर तालुक्याच्या वतीने चंद्रपूर दिनांक १७जुन २०२२ शुक्रवार रोजी १ वाजता क्षेञ संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालया समोर मूल रोड चंद्रपूर येथे आंदोलन होणार आहे. बफर क्षेञातील नागरिकांना अनेक समस्यांच्या सामना करावा लागत आहे. हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पचा अखत्यारीतीत असल्यामुळे अनेक येथील नागरिक पूर्वीपासून जंगलावर आधारित व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. वनजमितीचे स्थायी पट्टे मिळण्याबाबत नागरिकांनी दावे सादर केले आहे. मात्र वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची अन्यायकारक मोहीम वनविभागातर्फे राबविली जात आहे. त्यामुळे बफर क्षेञातील नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

या समस्येसंदर्भात भाजपातर्फे लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात बफर क्षेञातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपा तालुका महामंत्री गौतम निमगडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here