चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायती मधे काँग्रेस ची चार ठिकाणी सत्ता

0
432

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायती मधे काँग्रेस ची चार ठिकाणी सत्ता

भाजपचा एका नगरपंचायती वर झेंडा तर एका ठिकाणी त्रिशंकू…!

कोरपना, प्रवीण मेश्राम आज झालेल्या निवडणूक निकालात ,सावली, सिंदेवाही, कोरपना, गोंडपिपरी येथे काँग्रेस ची सत्ता पूर्ण बहुमताने काबीज केली असून पोंभूर्णा येथे भाजप तर जिवती येथे त्रिशंकू स्थितीत आहे .यामुळे काँग्रेस गोटात आनंदाची लहर असून भाजप ने चार तरी जागा जिंकू याचा फज्जा उडाला आहे.
सिंदेवाहित सतरा पैकी काँग्रेस ने तेरा,भाजप तीन,एक अपक्ष अशी तर सावली येथे सतरा पैकी 14 जागा,भाजप 3 उमेदवार निवडून आले तर कोरपना 17 पैकी 12 जागा व मित्र पक्ष 5 जागी विजयी झाले. गोंडपीपरी येथे 17 पैकी भाजप 4 तर काँग्रेस ने 7 जागी,सेना 2,राष्ट्रवादी 2, अपक्ष दोन जागी निवडून आले. पोंभूर्ना 17,पैकी भाजप 10,तर शिवसेना चार वंचित बहुजन आघाडी दोन तर काँग्रेस एका ठिकाणी जिकली आहे. यात कोरपना येथील निवडणूक चुरर्शी ची होती येथे काँग्रेस चे बावणे गटाचे विरोधात सर्व पक्ष एकवटले होते .येथे भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना एकत्र येऊन निवडणूक लढवली होती.त्याय बावणे गटाने बारा उमेदवार निवडून आणून सत्ता कायम राखण्यात यश संपादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here