एरंडोल येथील महाजन नगरात धाडसी घरफोडी

0
656

एरंडोल येथील महाजन नगरात धाडसी घरफोडी

 

 

जळगाव जिल्हा प्रतिनिधी/प्रमोद चौधरी

 

 

 

एरंडोल:येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगतच्या महाजन नगरात सोनू भालेश्वर डिंगे यांच्याकडे २६जून २०२१ रोजी भल्यापहाटे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १लाख रूपये रोकडसह १७हजारांचा ऐवज लंपास केला.

शहराच्या बाहेरच्या भागातील नविन वसाहतीत ही धाडसी चोरी झाल्यामुळे सर्वञ खळबळ उडाली आहे.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सुञांनी दिलेली माहीती अशी की एरंडोल येथील सोनू भालेश्वर डिंगे हा सफाई कामगार महाजन नगरात वास्तव्यास असून परीवारातील सर्वजण हॉलमध्ये दरवाजा उघडा ठेवून, लोखंडी ग्रिलच्या दरवाजाची कडी लावून झोपले असता भल्या पहाटे डिंगे हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना लोखंडी ग्रिलचा दरवाजा उघडा दिसला व कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच पुढील खोलीमधील लोखंडी कपाटाचे दार उघडे आढळुन आले, त्यातील सामान सुध्दा इतस्तत: फेकण्यात आला होता. घर बांधण्यासाठी कपाटाच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेली १लाख रूपयांची रोकड, ५हजार रूपये किंमतीचा मोबाइल, १२हजार रूपये किंमतीचे ५ ग्रँम वजनाचे सोन्याचे पेन्डन्ट अज्ञात चोरट्यांनी घरातून चोरून नेले.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल पंकज पाटील, संदीप पाटील, राजेश पाटील, अनिल पाटील हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here