पालम तालुका भाजपाचा चक्का जाम ,वाहतूक खोळंबली.

0
479

पालम तालुका भाजपाचा चक्का जाम ,वाहतूक खोळंबली.

आरूणा शर्मा परभणी जिल्हा प्रतिनिधी

ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने रद्द केले आहे,यामुळे समाजावर अन्याय होत असून शासनाने ओबीसी समाजाचे आरक्षण कायम करावे या मागणीसाठी पालम तालुका भाजपाच्या वतीने पालम -लोहा राष्ट्रीय महामार्गा वरील मुख्य चौकात शनिवार दिनांक 26 जून रोजी सकाळी 11 वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यामुळे काही वेळ पालम ते लोहा
रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. ‌ भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून रद्द झाली आहे,यामुळे ओबीसी समाज घटकावर राजकीय दृष्ट्या अन्याय झाल्याचे दिसून येते ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आल्यामुळे राज्यातील अंदाजे 55 हजार ओबीसी उमेदवार जागा संपुष्टात आले आहेत. राज्यातील आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुराव्यासह आपली भक्कम बाजू मांडली नाही त्याचा परिणाम आरक्षणाच्या निकालावरून पाहायला मिळते यामुळ ओबीसी समाजातील घटकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठीच संपूर्ण राज्यात शनिवारी 26 जुन रोजी भाजपाच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी व ओबीसी समाजाचे आरक्षण कायम करावे या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले याचाच एक भाग म्हणून पालम येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा कार्यकारिणीचे प्रदेश सदस्य गणेशराव रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .काही वेळ रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. सध्या राज्यात कोरोणा चे संकट असल्यामुळे सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात येऊन लवकरच आंदोलनाची सांगता करण्यात आली.यानंतर पालमच्या तहसीलदाराचे प्रतिनिधी तथा मंडळ अधिकारी के.पी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गणेशराव रोकडे दादा, भाजपाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे , भाजपाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष लिंबाजी टोले
पालम खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रामराव उंदरे, पालम तालुका भाजपाचे सरचिटणीस भगवान करंजे, सुनिल छाजड,नागनाथ आप्पा खेडकर,उत्तमराव भस्के,माधव वाघमारे,
प्रल्हाद गाणार,उत्तमराव गिनगिने,प्रल्हादराव कराळे,
नागोराव कराळे,सोपानराव कराळे,बबलू रोकडे,
विनायक गायकवाड,यासह आधी मंडळी आंदोलनात सहभागी होती. यावेळी पालम पोलिस स्टेशनचे स.पो.नि. कपिल शेळके यांच्या मार्गदर्शना खाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here