शेतकऱ्यांनी व्यवसाय वृध्दीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. 

0
484

शेतकऱ्यांनी व्यवसाय वृध्दीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. 

(जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची शेतकऱ्याच्या बांधावर बैठक संपन्न...)

बाबूराव बोरोळे

जिल्हा प्रतिनिधी लातूर

8788979819

दोन किमी अंतरावर असलेल्या सताळा (बु) (ता. उदगीर) येथे जिल्हा परिषद लातूर आयोजित कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाची बैठक शुक्रवारी (ता. २५) रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती रामचंद्र तिरुके यांच्या शेतात संपन्न झाली.

कृषी सभापती गोविंद चिलकुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जि.प. सदस्य महेश पाटील, कृषी अधिकारी चोले, पशुसंवर्धन अधिकारी पडिले, यशवंतराव चव्हाण मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे विस्तार विद्यावेत्ता अरुण गुटे व मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर दिग्रसे हे उपस्थित होते. तर परिसरातील डिग्रस, डिगोळ, हाळी, देवणी, कबनसांगवी, आंबेवाडी, जांभळवाडी, येरोळ,कानेगाव आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.

बैठक भरण्या अगोदर पदाधिकारी, अधिकारी आणि बाहेर गावाहून आलेल्या शेतकऱ्यांनी रामचंद्र तिरुके यांची शेतीची पाहणी करून. १२ एकर ऊसासोबत टोमॅटो आणि कोथिंबीर हे अंतर पिक, शेणखत, पाणी व्यवस्थापन, दोन सरीतील अंतर बांधावर लावलेली विविध फळझाडे या बाबींनी उपस्थितांची मने जिंकली. या बैठकीत कृषी मध्ये असलेल्या विविध योजना, लाभार्थ्यांची निवड तसेच पिकांचे व्यवस्थापन, पडणारे रोग आणि त्यावर नियंत्रणासाठी वापरणाऱ्या औषधांची घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. एकंदरीत उत्पादन वाढविण्यासाठी लागणारी शास्त्रशुद्ध माहिती देण्यात आली.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय बाबतीत नवीन रेतन पद्धत अवलंबीण्याचे आवाहन करण्यात आले. जेणे करुन कालवड किंवा वगार हेच जन्माला येतील. पशुसंवर्धन जनावरांसाठी गोठा योजनेचा तसेच खवा उद्योगासारख्या योजनांचा लाभ घ्यावा. यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी विशेष सवलत असल्याचे सांगितले. बैठकीत सुत्रसंचालन डॉ सतीश केंद्रे यांनी केले तर आभार रामचंद्र तिरुके यांनी मानले.

……..

लातूर जिल्ह्यातील हवामान, पर्जन्यमान, विभिन्न असून पेरणी मागेपुढे झाली आहे. कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून बायोगॅस योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. सोयाबीन, तुर पिकांचे व्यवस्थापन करुन तंत्रज्ञानाचा वापर करावा. पेरणी, फवारणी ही शास्त्रशुध्द पध्दतीने करावी. कारण ७५ -८० हजार हेक्टर वर तुरीचे अंतर पिक म्हणून उत्पादन घेतले जाते. तुरीला बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा चा डोस जूलैच्या शेवटच्या किंवा अॉगस्टच्या पहिल्या आठवड्यात द्यावा. बायोमिक्स कृषी महाविद्यालय लातूर येथे उपलब्ध असून त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा. घन आणि द्रव स्वरुपात उपलब्ध आहे. बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करु नये. 

 

अरुण गुटे 

विस्तार विद्यावेत्ता, यशवंतराव चव्हाण मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

…….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here