शासकीय आदेशाला धाब्यावर मांडून शिवजयंती जल्लोषात साजरी

0
693

शासकीय आदेशाला धाब्यावर मांडून शिवजयंती जल्लोषात साजरी

राजुरा । कोव्हिड-19 चा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी शिवजयंती अत्यंत साधेपणाने कमीत कमी संख्येत साजरी करण्याचा आदेश दिला. मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी या शासकीय आदेशाची पायमल्ली करत नियमांना धाब्यावर मांडून शिवजयंती जल्लोषात साजरी केल्याचे दिसून आले. यामुळे स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यशासनाने 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाने शिवजयंती उत्सव साजरा करताना दक्षता बाळगून अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते खरे!
मात्र जल्लोषात निघालेल्या मिरवणुका स्थानिक प्रशासनाच्या कार्यवाहीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसून आल्या. 10 व्यक्तींच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याची परवानगी देण्यात आली होती. याशिवाय मास्क व स्यानिटायझरचा वापर करणे गरजेचे होते. तरी राजुरा तालुक्यात ठीक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात आला. शिवाय लेझीम नृत्य व भव्य मिरवणूक काढण्यात आली.आणि शासनाच्या परिपत्रकाला तिलांजली देऊन कोरोनाच्या प्रासारा करिता मोलाचे योगदान दिले आणि प्रशासन साखर झोपेत असल्यामुळे ‘कही ख़ुशी कही गम’ असे चित्र पाहावयास मिळाले. अत्यंत साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आदेश असताना स्थानिक प्रशासनाकडून यावर कोणतेही निर्बंध न लादता मोकळीकता देण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे यावर कोणती कारवाई केली जाईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here