आष्टी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

0
252

आष्टी येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे एका तरुणाने आपल्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव मनोज सुभाष चांदेकर वय ३१ रा आष्टी असे असून तो स्वताला घरात बंद करून होता .सायंकाळ पर्यंत तो बाहेर पडला नाही म्हणून घरातील नातलगांनी आतून लावलेली कडी काढून घरात प्रवेश केला असता तो पंख्याला गळफास लावलेल्या स्तीथीत दिसला लगेचच आष्टी पोलीस स्टेशन ला माहिती दिली त्यावरुन प्रभारी पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, सहायक पोलिस निरीक्षक मडावी, पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे सहायक पोलिस उपनिरीक्षक संघरक्षीत फुलझेले यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याची डेथ बॉडी खाली उतरून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामिण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला.आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. आत्महत्या का केली याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक संघरक्षीत फुलझेले करीत आहेत.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here