खासदार अशोक नेते यांनी जाणल्या वसंतपुर येथील समस्या नवनियुक्त सरपंच,उपसरपंचांचा सत्कार

0
412

खासदार अशोक नेते यांनी जाणल्या वसंतपुर येथील समस्या

नवनियुक्त सरपंच,उपसरपंचांचा सत्कार

 

– :चामोर्शी तालुक्यातील वसंतपुर ग्रामपंचायत ला खासदार अशोक नेते यांनी भेट दिली व येथील नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या अडचणी, समस्या दूर करण्यासाठी लवकरच 3 मार्च ला बैठक लावून संबंधित अधिकाऱ्यांना तसे निर्देश देऊन त्वरित समस्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन यावेळी खासदार अशोक नेते यांनी शेतकऱ्यांना दिले.वसंतपुर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार मा. अशोकजी नेते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी मोर्चा चे प्रदेश महामंत्री प्रकाशजी गेडाम, प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वप्निलजी वरघंटे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा निखिल भारतीय बंगाली उद्बोधन समितीचे अध्यक्ष मा.दिपकजी हलधर, भाजप बंगाली आघाडी चे तालुका महामंत्री विधानजी वैद्य, बंगाली आघाडी चे माजी अध्यक्ष परिमलजी सरकार, वसंतपुर च्या सरपंच स्वास्ती राकेश सरकार, उपसरपंच मेनुका रॉय, कालीनगरचे सरपंच पवन मंडल व गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते वसंतपुर ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला बद्दल वसंतपुर च्या सरपंच स्वास्ती राकेश सरकार, उपसरपंच मेनुका रॉय, ग्रा पं सदस्य अमरी रतिकांत मंडल, श्रीराम हरेन बिश्वास, कालीनगरचे सरपंच पवन मंडल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here