‘मेरा राजुरा मेरा अयोध्या’ संकल्पनेतून राजुऱ्यात श्रीराम मंदिर उत्सव समीतीकडून स्वच्छता अभियान

0
596

‘मेरा राजुरा मेरा अयोध्या’ संकल्पनेतून राजुऱ्यात श्रीराम मंदिर उत्सव समीतीकडून स्वच्छता अभियान

आनंद अयोध्येतील मूर्ती स्थापनेचा, परिसर स्वच्छ करू प्रत्येक मंदिरांचा – देवराव भोंगळे

श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीतील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा जल्लोष राजुरा शहरात मोठ्या उत्साहात होत आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मेरा गाव मेरी अयोध्या’ या संकल्पनेच्या धर्तीवर राजुरा शहरात श्रीराम मंदिर उत्सव समितीच्या वतीने ‘मेरा राजुरा मेरी अयोध्या’ हे अभियान राबवले गेले.


यात सहभागी होऊन शहरातील श्री हनुमान मंदिर देवस्थान, श्रीराम मंदिर, शिवाजी महाराज पुतळा, जामा मस्जिद, खोजा शिया मस्जिद, क्रांतीवीर नारायणसिंह उईके पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इॅस्काल चर्च अणि गुरू तेग बहादूरजी गुरुद्वारा परिसरात सामुहिक स्वच्छता केली.


या स्वच्छता अभियानात माजी आमदार ॲड. संजय धोटे,ॲड. अरूण धोटे,ॲड. निनाद येरणे, राधेश्याम अडाणीया, डॉ. सुरेश उपलेंचीवार, सतिश धोटे, सुरेश रागीट, ॲड. बद्देलवार, संजय जयपुरकर, राजु डोहे, ॲड. नितीन वासाडे, संदिप जैन, प्रशांत गुंडावार, दिलीप वांढरे, अनंता येरणे, गजेंद्र झंवर, वाघू गेडाम, छबिलाल नाईक, सचिन बैस,पुनम शर्मा, जनार्धन निकोडे, विनोद नरेन्दुलवार, सुरेश धोटे, प्रमोद लांडे, मंगेश श्रीराम, प्रकाश बेजंकीवार, गणेश रेकलवार, मस्जिद कमेटीचे बाबा बेग, कस्लिम कुरेशी, अहमद हुसेन, रफिक कूरेशी, शालाम चाहूस, रज्जाक अली बंदाली, उज्ज्वला जयपुरकर, गजाजन भटारकर, अजय उमरे, प्रियदर्शनी उमरे, मंगलसिंग चव्हाण, अमोल आकनुरवार, चर्चचे पाॅल कलेगुरी, गुरूद्वारा कमेटीचे हजभजसिंह भट्टी, बृहस्पती साळवे, अमोल मोरे यांचेसह मोठ्या संख्येने विविध राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ता-पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here