माविम च्या भोंगळ कारभारामुळे जिवती तहसिल कार्यालय सेतु विभागात सामान्य माणसाची लूट

0
554

माविम च्या भोंगळ कारभारामुळे जिवती तहसिल कार्यालय सेतु विभागात सामान्य माणसाची लूट

● प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या आरोप

 

 

जिवती : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या ठेकावर बसलेल्या अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणार्‍या जिवती तालुक्यातील तहसिल कार्यालयातील सेतु केंद्रातील कॉम्प्युटर ऑपरेटर दयानंद कोमले हा व्यक्ती उत्पन्नाचे प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी १५० रुपय तहसिल कार्यालयातील सेतु विभागातील दयानंद कोमले नावाचा कर्मचारी यांना द्यावे लागत आहे, यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग, मजुर वर्ग, व सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील एकच नागरीक नाही तर अनेक नागरिकांनी प्रमाणपत्र कधी मिळणार अशी दयानंद कोमले यांना विचारणा केली असता, तातडीने पाहिजे असेल तर १५० रुपये द्यावी लागेल असे दयानंद कोमले म्हणाले आहे अशा आरोप तालुक्यातील सामान्य नागरिक करित व प्रहार चे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी केला आहे.

तसेच सामान्य नागरिकांत दबक्या आवाजात जिवती तालुक्यातील तहसिल कार्यालयातील सेतु विभागातील जास्त पैसे दिल्याशिवाय कामच करीत नाही व जास्त पैसे देले कि एका तासाच दाखला भेटलो, पैसे दिले नाही तर दाखला भेटत नाही, अशा संतप्त व्यक्त केला जात आहे.

तहसिल कार्यालयातील सेतु विभागातील अशा कर्मचारी विरोधात लवकर चौकशी करून या कर्मचारावर, जिवती तहसिल कार्यालयातील तहसिलदार यांनी तात्काळ दखळ घेऊन प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी जिवती तालुक्यातील सामान्य नागरिक करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here