अखेर पोंभूर्णा तालुक्यातील त्या अतिक्रमणधारकांना दिलासा नाही

0
728

अखेर पोंभूर्णा तालुक्यातील त्या अतिक्रमणधारकांना दिलासा नाही

अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांचा न्यायनिवाडा

 देवाडा खुर्द वासीयांना दिवाळीपूर्व शासनाची अप्रतिम भेट

बोगस अतिक्रमण धारकामध्ये खळबळ

 

पोंभुर्णा प्रतिनिधी:- पोंभूर्णा तालुक्यातील सर्वात मोठा महसुली गाव असलेला देवाडा खुर्द येथे गावविकासाची राखीव शासकीय जागा बोगस अतिक्रमण धारकांनी खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करून तत्कालीन उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते व महसुल अधिकाऱ्यांशी संगनमत करून राजकीय लोकांना हाताशी धरून महसुल विभागाची दिशाभुल करून उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी कडुन सन २०१४-१५ मध्ये मोठ्या प्रमाणात गावविकासाची चराईची व मोठ्या जंगलाची शासकीय जागा अनाधिकृतरित्या हस्तगत करून मालकी हक्क प्राप्त करून घेतला . परंतु हि बाब ग्राम पंचातयचे सरपंच विलास मोगरकर यांच्या लक्षात येता त्यांनी पोंभूर्णा तालुक्यातील बोगस अतिक्रमण धारकांविरूद्ध मा . उच्च न्यायालय नागपूर खंडपिठात रीठ याचीका दाखल केली . मा . उच्च न्यायालयाने देवाडा खुर्द गावकऱ्यांचा विचार करता उच्च न्यायालयाने बोगस पट्टेधारकांना नाकारल्याने मा . जिल्हाधिका – यांनी या प्रकरणात सखोल न्यायालयीन चौकशी करून पोंभूर्णा तालुक्यातील ३१ बोगस पट्टेधारकांचे पट्टे तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिनांक ११ / ११ / २०१ ९ रोजी दिले . बोगस पट्टेधारक आपली अतिक्रमणीत जागा वाचवण्यासाठी जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल केले परंतु तीथेही त्यांना काही निष्पन्न झाले नाही . अखेर त्यांनी विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांचेकडे पुनर्निरिक्षण अपिल दाखल केली असता अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांनी अपिलार्थी व गैरअपिलार्थी यांची बाजू ऐकुन सर्व कनिष्ठ न्यायासनाचा अभिलेख मागुन अखेर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा दिनांक ११ / ११ / २०१ ९ चा आदेश कायम करत ग्राम पंचायत देवाडा खुर्द यांच्या बाजूने निकाल देत ३१ बोगस पट्टेधारकांना पट्टे रद्द करण्याचा आदेश पारीत केलेला आहे . विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर न्यायालयाचा देवाड़ा खुर्द वासीयांनी स्वागत केले असून ग्राम पंचायत देवाडा खुर्द यांना गावविकासाची व चराईची तसेच मोठ्या झाडांच्या जंगालची जागा परत मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये हर्षोउल्हासाचे वातावरण आहे . तर बोगस पट्टेधारकांचे दिवाळी हवालदिल झालेली आहे ….

 

 

 मी गाव विकासासाठी अखेरच्या श्वासापर्यंत न्यायालयीन लढा देत राहील . परंतु महसुल विभागाने भुमीअधिग्रहण करून ग्रामपंचायत देवाडा खुर्द यांचेकडे तात्काळ ताबा दयावा व बोगस पट्टेधारक व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून गावविकासात हातभार लावावा . विलास आबाजी मोगरकर सरपंच

 ग्राम पंचायत देवाडा खुर्द . !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here