अखेर इम्पॅक्ट 24 च्या वृत्ताची घेतली दखल

0
469

अखेर इम्पॅक्ट 24 च्या वृत्ताची घेतली दखल

चारगाव चौकी ते ढाकोरी बोरी रस्त्यासाठी मनसे ने घेतला पुढाकार

 

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले
यवतमाळ जिल्हाचे वणी तालुक्यातील चारगाव ते ढाकोरी बोरी हा मार्ग चंद्रपूर जिह्वा व तेलंगणा राज्याला जोडणारा असून या मार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे.या मार्गाने साधे जानेही कठीण झाले आहे. कित्येकांचे अपघातही झाले मात्र या मार्गचे साधे खडकीकरण किंवा डांबरीकरण देखील झाले नाही. या मार्गांवर खदान असल्याने जड वाहनांची सतत ये-जा असते. त्यामुळे या मार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशा आशयाचे वृत्त इम्पॅक्ट24 ने प्रसिद्ध करून शासन-प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असंख्य कार्यकर्ते व पधादिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here