जळगावातील कोरोना योध्या पो.ना. विनोद अहिरे यांनी लिहिले देशातील कोरोणा योद्ध्यांच्या वेदनेचे पहिले पुस्तक

0
421

जळगावातील कोरोना योध्या पो.ना. विनोद अहिरे यांनी लिहिले देशातील कोरोणा योद्ध्यांच्या वेदनेचे पहिले पुस्तक

जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले, पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे गेल्या तीन महिन्यापासून जळगाव कोरोना कक्षाची ड्युटी करीत आहेत. दि.21/4/2020 रोजी अहिरे यांची प्रथमच कोरोना कक्षात ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळेस कोरोणाची जनमानसात प्रचंड दहशत होती त्यात पोलीस दलही अपवाद नव्हते. त्यामुळे श्री अहिरे देखील कुटुंबीयांच्या काळजीने प्रचंड भयभीत झाले होते ते आमच्याशी बोलताना म्हणाले की माझ्या अठरा वर्षाच्या नोकरी मध्ये आतापर्यंत ड्युटी करण्याची इतकी भीती कधीच वाटली नव्हती याअगोदर अनेक जोखमीच्या ठिकाणी दंगलीमध्ये जिवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडले आणि झालो जरी जखमी किंवा जीवही गेला तर ते आपल्या पुरती मर्यादित होते पण कोरोना कक्षाची ड्युटी करताना हा आपल्यालाच धोका नसून आपल्या कुटुंबियांना देखील धोका निर्माण होऊ शकतो पर्यायाने मृत्यूदेखील येऊ शकतो या कल्पनेने मी अक्षरशः भेदरून गेलो होतो तरी देखील माझ्यासाठी देश महत्त्वाचा होता कर्तव्य महत्त्वाचे होते परंतु ज्या कोरोणा कक्षात ड्युटी करताना ज्या माझ्या भावना होत्या मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दबद्ध करून मी 22/4/ 2020 रोजी फेसबुक वर फेसबुक पोस्ट केली त्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि अनेकांनी मला फोन करून सांगितले की तुम्ही तुम्हाला आलेल्या अनुभवांचे पुस्तक  लिहा जेणेकरून समाजाला माणसांना पोलिसांच्या ड्युटी करतानाच्या वेदना देखील कळतील यामुळे याला प्रचंड प्रतिसाद मिळाला या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांनी एकवीस दिवसातील कर्तव्याचे आलेले अनुभव त्यांच्या वेदना दिनांक 16/ 4 /2020 रोजी मृत्यू घराचा पहारा या शीर्षकाखाली पूर्ण पुस्तक लिहून काढले सदर पुस्तकाला नाशिक शहराचे पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील यांनी प्रस्तावना दिलेली आहे.पोलीस अधीक्षक जळगाव, व निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी पुस्तकाला लेखी स्वरूपात शुभेच्छा दिलेल्या आहेत.
तसेच विनोद अहिरे यांना पोलीस खात्यामध्ये ज्यांनी भरती केले असे प्रवीण साळुंके साहेब यांना यांच्यासह या कोरोणा महामारी मध्ये ज्यांनी आपल्या जीवाचे दान दिले आहे. तसेच कोरोना महामारी विरुद्ध लढणार्‍या योद्ध्यांना अर्पण केलेले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी त्या पुस्तकाला अर्थसहाय्य केलेले आहे सदर पुस्तकामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर देखील मुख्यमंत्री हे जनतेचे पालक या शीर्षकाखाली लेख लिहिण्यात आलेला आहे तसेच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले संपूर्ण एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीत जमा करणारे ते एकमेव कर्मचारी आहेत.
त्यांनी प्रकाशनापूर्वीच आपली पहिली प्रत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेली आहे. ते म्हणाले की,माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विशेष प्रभाव असल्याने माझे विचारही तसेच आहेत. त्यांच्या विचारांमुळेच मी हे पुस्तक लिहू शकलो.
माझं वैयक्तिक मत असं आहे की, प्रत्येकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दडलेले आहेत. तुमच्यावर कितीही अन्याय झाला. कितीही संकट आली तरी तुम्ही या महापुरुषांना त्यांच्या विचारांना तुमच्या आत मध्ये जिवंत ठेवा मग तुमच्यामध्ये ते एका योंध्याच्या रूपाने असू शकतात. किंवा एका विद्रोहाच्या रुपाने असू शकतात. खेळाडूचे रूपांमध्ये असू शकतात.कवीच्या रुपयांमध्ये असू शकतात. वक्त्याच्या रूपामध्ये असू शकतात किंवा साहित्यिकाच्या रूपामध्ये असू शकतात त्यांना नेहमी जागते ठेवा. त्यांच्या विचारांची ज्योत कधीच विझू देऊ नका,कदाचित ते माझ्यामध्ये साहित्यिकाच्या रूपाने असतील म्हणूनच मी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कोरोना कक्षामध्ये मृत्यूची भीती असून सुद्धा मी हे पुस्तक लिहू शकलो याचं श्रेय फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते‌
वेदना ह्या साहित्याचा केंद्रबिंदू आहेत. साहित्य हे वेदनेभोवतीच फिरत असते. मला फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची लाभ लावलेली थोडीफार साहित्य दृष्टी मला नेहमी प्रेरणा देत असते…. म्हणूनच हे पुस्तक मी लिहू शकलो. या पुस्तकाच्या मुळाशी माझी वेदनाच आहे. फक्त मी त्या वेदनेचा बाजार न मांडता त्याऐवजी मी लिखाणाने ती वेदना शमवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केलेला आहे. असेही ते म्हणाले.

विशाल सुरवाडे जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here