आमदार निधीतून मंजूर समाधी वार्ड येथील कॉंक्रीट रोडच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन

0
373

आमदार निधीतून मंजूर समाधी वार्ड येथील कॉंक्रीट रोडच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन

 

 

समाधी वार्ड येथील कॉंक्रीट रोड व भुमिगत नालीच्या बांधकामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी आमदार निधीतून 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आज सदर कामाचे भुमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉंग्रसचे नगर सेवक नंदू नागरकर, कॉंग्रेस शहर कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, नगर सेविका सुनिता लोढीया, नगर सेविका अनुराधा हजारे, नगर सेवक निलेश खोब्रागडे, नगर सेवक अमजत अली, प्रविण लांडगे, यंग चांदा ब्रिगेडच्या अल्प संख्याक विभागाच्या शमा काजी, वैशाली रामटेके, विलास सोमलवार, बेबी उईके, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेड व कॉंग्रेसच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.

शहरातील समाधी वार्ड येथे नाली व रोडचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नगर सेवक व नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केली होती. सदर मागणीची तात्काळ दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी या कामासाठी आमदार निधीतील 30 लक्ष रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला. दरम्याण आज सोमवारी या कामाच्या भुमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विधीवतरित्या पुजा करुन सदर कामाचे भुमिपूजन केले. समाधी वार्डातील या मार्गाची अवस्था अतिशय खराब होती. त्यामूळे येथील नागरिकांना सदर मार्गावरुन प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आता आमदार निधीतून हा मार्ग तयार होत असल्याने नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे.

नागरिकांना मुलभुत सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यावर आपला भर आहे. शहरातील पाणी प्रश्न सुटावा याकरिता मोठा निधी आपण चंद्रपूर महानगर पालिकेला दिला आहे. या निधीतून शहरातील विविध ठिकाणी ट्युबवेल, हातपंप, छोट्या पाण्याच्या टाक्या तयार केल्या जात आहे. समाधी वार्ड हा शहरातील प्रमूख भाग आहे. त्यामूळे या भागाच्या विकासासाठीही आपले प्रयत्न सुरु असून येथील अनेक कामे प्रस्तावीत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सदर भुमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here