शिवसेनेच्या उपसेनापती सोबत मिळून गोंडपिपरी शहराचा विकास साधू – आ.सुभाष धोटे

0
462

शिवसेनेच्या उपसेनापती सोबत मिळून गोंडपिपरी शहराचा विकास साधू – आ.सुभाष धोटे

नगरपंचायत नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदग्रहण सोहळा संपन्न

 

गोंडपिपरी– नगरपंचायत नवनिर्वाचित अध्यक्ष ,उपाध्यक्षांचा निवडणूक कार्यक्रम दि.१७ गुरुवारी नगरपंचायतीत पार पडला.यात नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या सविता कुळमेथे यांची तर उपाध्यक्ष पदी शिवसेनेच्या सारिका मडावी यांची वर्णी लागली.त्याच अणुशंगाने नगरपंचायतीने नवरनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहन सोहळा कार्यक्रम दि.२१ सोमवारी नगरपंचायतच्या सभागृहात आयोजित केला होता यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी शिवसेनेचे उपसेनापती म्हणजेच जिल्हाउपप्रमुख संदिप करपे यांच्या साथीने विकास साधू अस मत व्यक्त केले सोबतच आमदार म्हणून कुठलीस विकास निधी कमी पडू देणार नाही मिळून सर्व पक्षाने काम करावे पालकमंत्री विजय वडेट्टीवार देखील विकास निधी देईल असा विश्वास उपस्थितांना संबोधित करतांना आमदारांनी व्यक्त केले.यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदिप करपे यांनी भ्रस्टाचार खपवून घेणार नाही नगरविकास मंत्र्यांकडून निधी आणणार असल्याचे मत व्यक्त केले यावेळी उपविभागीय ढवळे,तहसीलदार के डी मेश्राम,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडुरवार, बाजारसमिती सभापती सुरेश चौधरी ,काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार,बबन निकोडे,संजय माडुरवार, शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे, रेखा रामटेके ,अजय माडुरवार ,देविदास सातपुते,संतोष बंडावार,गौतम झाडे शीनु कंदणुरिवार, बब्बू पठाण,आनंदराव गोहणे,रमेध नायडू,विवेक राणा यांच्यासह शेकडो नागरिकांनी नगराध्यक्ष सविता कुळमेथे,उपनगराध्यक्ष सारिका मडावी,नगरसेवक अनिल झाडे,सुनील संकुलवार,चेतन गौर,यादवराव बांबोडे,मनीषा दुर्योधन,,रंजना रामगिरकार,सचिन चिंतावार,वनिता वाघाडे, मनिशा मडावी,अश्विनी तोडासे,शारदा गरपल्लीवार, सुरेश चिलनकर उपस्थिती होती नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पदभार स्वीकारला सोबतच सर्व नवनिर्वाचित नगरसेवांना पुढील वाटचलीकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन फुलझले यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here