नेत्रदीप काम करणारा सारंग बोबडे चंद्रपूर भूमीचा गौरव वाढविणारा भूमिपुत्र

0
487
नेत्रदीप काम करणारा सारंग बोबडे चंद्रपूर भूमीचा गौरव वाढविणारा भूमिपुत्र
 
खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते सत्कार
चंद्रपूर : भारतात नेत्रदीपक काम करणाऱ्या 30 व्यक्तींची यादी फॉर्ब्स इंडिया या मासिकात प्रकाशित केली जाते. चंद्रपुरचा भूमिपुत्र सारंग बोबडेची या मासिकाने दखल घेतली असून त्याला भारतातील 30 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे. त्याने विकसित केलेल्या ‘डोनेटकार्ट’ या ऍपच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याची सोय झाली आहे. अनेक एनजीओना मदत करताना लोकांना साशंकता असते की ही आपल्या पैशांचा योग्य उपयोग होणार का. हा संभ्रम दूर करण्यासाठी ह्या ऍपची खूप मदत झाली आहे. याचीच दखल फॉर्ब्स इंडियाने घेतली आहे. खासदार बाळू धानोरकर यांनी देखील त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या सत्कार केला.
यावेळी प्रा. विजय बदखल, कालिदास बोबडे, विनोद पिंपळशेंडे, शरद चिलबुले, रतन शिलावार यांची उपस्थिती होती.
चंद्रपूरच्या 26 वर्षीय सारंग कालिदास बोबडे या युवकाने नावीन्यपूर्ण आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी धडपडणार्‍या तरुण, प्रभावशाली उद्योजक, व्यवसायिक, डिझायनर, तसेच खेळाडूंचा ‘फोर्ब्स इंडिया’ यादीत मान मिळविला आहे.  मूळचे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी असलेले सारंग चे वडील कालिदास बोबडे हे चंद्रपूर तालुक्यातील पिंपरी येथील जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत तर आई याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सारंग चे दहावीपर्यंत शिक्षण चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूल मध्ये पूर्ण झाले. मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
2017 नंतर अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे हे त्रिकूट एकत्र आले. या तिघांच्या परिश्रमातून डोनेटकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा जन्म झाला. या माध्यमातून 10 लाखाहून अधिक देणगीदारांकडून तब्बल 150 कोटींच्या देणग्या विविध भागात काम करणाऱ्या 1 हजार स्वयंसेवी संस्थांना पुरविण्याच्या अनोखा विक्रम या त्रिकुटाने केला आहे. याची दखल ‘फोर्ब्स इंडिया’ या मासिकाने जागतिक पातळीवर घेतली. या मासिकाने 2022 च्या अंकात भारतातील 30 वर्षाखालील युवकांच्या 30 जणांमध्ये एनजीओ अँड  सामाजिक उद्योजकता गटाध्ये ‘सहसंस्थापक डोनेटकार्ट’ म्हणून अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे यांचा समावेश केला आहे. इतर दोघे हे अन्य राज्यातील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here