राज्य शासनाने ग्राम पंचायतीना काढलेला अन्यायकारक परिपत्रक रद्द करावा

0
511

राज्य शासनाने ग्राम पंचायतीना काढलेला अन्यायकारक परिपत्रक रद्द करावा

ग्रामपंचायत सोनापूरच्या वतीने निषेध व्यक्त करीत केलं आंदोलन

✍️सुखसागर झाडे गडचिरोली:-

ग्राम पंचायत च्या स्थापने पासून स्ट्रीट लाईट चे बिल राज्य शासन भरत आहे, परंतु मागील काही वर्षांपासूनचं थकीत असलेले बिल शासनाने स्वतः न भरता ग्राम पंचायतने १५ वित्त आयोगाच्या निधीतून अदा करावे. असा जीआर 23 जून 2021 रोजी काढला.ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून, स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा योजनेचा विज बिल ग्राम पंचायतीने 15व्या केंद्रीय वित्त आयोगाने दिलेल्या निधीतून भरावं, म्हणून जाहीर केले. परंतु हा राज्य शासनाचा निर्णय राज्यातील सर्वच ग्राम पंचायतीस वेठीस धरणारा आहे. राज्य शासनाच्या विरोधात बंड पुकारीत ग्राम पंचायत सोनापूर ता चामोर्शी च्या वतीने ग्राम पंचायत समोरील पटांगणात सरपंचा गॊपिका टेकाम यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत ने 15 वित्त आयोगा मधून वीज बिल भरल्या गेले तर नियोजित विविध घटकांवर खर्च करता येणार नाही, तसेच ग्राम विकासाचे कोणत्याही प्रकारची कामे करू शकत नाही. म्हणूनच शासनाने 23 जुनचा परिपत्रक रद्द करून, स्वतः राज्य सरकारने पूर्वी प्रमाणे स्ट्रीट लाईट विज बिल भरावे, अशी मागणी ग्राम पंचायत कडून करण्यात येत आहे. यावेळी शेषराव कोहळे उपसरपंच, अनिल उंदिरवाडे सदस्य, उत्तम कोवे सदस्य, संदीप सोयाम सदस्य,सविता कुंनघाडकर सदस्या, कल्पना सिडाम सदस्या, उषा चलाख सदस्या याप्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here