महसंघाने मिळवून दिली होम लोन सबसिडी

0
412

महसंघाने मिळवून दिली होम लोन सबसिडी

पीड़िताने आढाव यांचे मानले आभार

 

पुणे :- जिल्ह्यातील तीन पिडीत व्यक्तीची बैंकेत अडकलेली होम लोन ची सब्सिडी ही स्थानिक माहिती अधिकार कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ वडगावशेरीचे मुख्य प्रचार प्रमुख असलेले अब्राहाम आढाव यांच्या प्रयत्नामुळे पीडितांच्या खाते मध्ये लगेच जमा झाल्याचे वृत जिल्ह्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे . यातच बैंकेत महीनों महीने अडकलेली हक्काचे सब्सिडी लगचे खातेमध्ये जमा झाल्याने पीड़िताकडून अब्राहम आढाव यांचे पुष्गुच्छ देवून आभार व्यक्त करन्यात आले . पीडितांमध्ये एका पुरुषासहित दोन महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सचिन जाधव यांनी आयसीआयसीआय बँकमधुन नऊ लाख रूपयाचे होम लोन घेतले होते , पुणे स्वारगेट येथील नसरीन शेख यांनी बँक ऑफ महाराष्ट् बारा लाख रूपयाचे होम लोन घेतले होते , तर वडगावशेरी पुणे येथील पीडिता ऋतुजा तावरे यांनी इंडसंड बँक चोवीस लाख रूपयाचे होम लोन घेतले होते . या होम लोन वर नियमानुसार काही टक्के रक्कम होम लोन सब्सिडी म्हणून लाभार्थीच्या खातेवर लगेच जमा होने अपेक्षित असूनही बैंक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे पीडितांच्या खातेवर सब्सिडी जमा करन्यात आली नव्हती.

अशाच प्रकरणात माहितीचा अधिकार अर्ज करून अब्राहाम आढाव यांनी आपली दोन वर्षापासून अडकलेली सबसिडी प्राप्त करून घेतली होती. याविषयी बातम्या अनेक वृतपत्रात प्रसिद्ध केल्याने ती सोशल मीडियामध्ये जास्त व्हायरल झाली . आपल्याला सुद्धा न्याय मिळावा म्हणून तीनही पीडितांनी अब्राहाम आढाव यांच्याशी संपर्क करून तिघानी पंतप्रधान आवास योजना निर्माण भवन नवी दिल्ली कार्यालयात
ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज दाखल केला .प्रथमता अर्ज़ावर कार्यालयाने कोणतीच कार्यवाही केली नाही . नंतर अब्राहाम आढाव यांच्या मार्गदर्शनाने कलम १९(१) प्रमाणे वरिष्ठ कार्यालयकड़ें प्रथम अपील केले .

प्रथम अपील अधिकारी ने हे अर्ज त्वरित कार्यवाहीसाठी घ्या असे आदेश दिल्याने सदर अर्जदारांची होम लोन सबसिडी एकूण 267000 रुपये इतकी रक्कम त्यांच्या लोन खात्यावर अपील केल्यानंतर तीस दिवसात जमा झाली आहे.

बैंकेत महीनों महीने अडकलेली हक्काचे सब्सिडी लगचे खातेमध्ये जमा झाल्याने सचिन जाधव, नसरीन शेख आणि ऋतुजा तावरे या तीनही पीड़िताकडून अब्राहम आढाव यांचे पुष्गुच्छ देवून आभार व्यक्त करन्यात आले . सदर कायदेशीर पाठपुराव्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक सुभाष बसवेकर आणि राज्य कार्याध्यक्ष शेखर कोलते यांनी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे आढाव यांनी प्रतिनिधिशी बोलताना सांगितले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here