रमाबाई वॉर्ड राजुरा येथे वंचित बहुजन आघाडी ची महिला शाखा गठित

0
1167

रमाबाई वॉर्ड राजुरा येथे वंचित बहुजन आघाडी ची महिला शाखा गठित

राजुरा, 16 फेब्रु. : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी जोमाने कार्याला लागली आहे. जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी ‘गाव तेथे शाखा’ या अभियानाला सुरवात केली असून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियतेने सहभाग घेताना दिसून येत आहे. याच अभियानांतर्गत काल रमाबाई वॉर्ड राजुरा येथे वंचित बहुजन आघाडी ची महिला शाखा गठित करण्यात आली.

यावेळी राज्य कार्यकारिणी विशेष समन्वयक कुशल मेश्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, जिल्हा महिला अध्यक्षा कविता गौरकर, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव अंगलवार, नरेंद्र कुलमेथे, आयटीसेल प्रमुख अमोल राऊत, तालुका अध्यक्ष सुशिल मडावी, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे तसेच तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर महिला कार्यकारिणी गठित करण्यासाठी प्रियंका रामटेके व धनंजय बोर्डे यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी वार्ड शाखा अध्यक्ष म्हणून वैशाली दुबे, उपाध्यक्ष प्रियदर्शनी वनकर, महासचिव खडसे तर संघटक सचिव म्हणून ललिता ठमके यांची निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here