तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य प्रतिमेच्या उभारणीसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम

0
551

तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य प्रतिमेच्या उभारणीसाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम

17 जानेवारी रोज सोमावरला सायंकाळी 6.30 वाजता मिलिंद संजोग मंडळ बामणवाडा च्या वतीने लुंबिनी बुद्ध विहार बामणवाडा येथे पोष पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती 10 फूट उंचीची बुद्ध प्रतिमा स्थापन करण्याकरिता भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. भदंत धम्म घोष मेत्ता रा. चंद्रपूर मा. भदंत सुचित बोध मिलिंद संजोग मंडळाचे अध्यक्ष धर्म किसन नगराळे, कोषाध्यक्ष अनिल माधव लभाने,  पोलिस पाटील आनंद नगराळे, दिवाकर तावाडे, दिपक नगराळे, चंद्रकला नगराळे, ताराबाई लभाने, मंदा नगराळे, आणि गावातील उपासक व उपसिका, यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, त्यानंतर वरील मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तत्पूर्वी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार व फुल, अगरबत्ती, मेणबत्ती, लावून बुद्ध वंदना व परित्रान पाढ घेण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील बौद्ध उपासक व उपसिका बहुसंख्येने उपस्थित राहून उत्स्पूर्थ प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here