ट्रायबल फोरम जिल्हा महासचिव पदी विलास मडावी

0
493

ट्रायबल फोरम जिल्हा महासचिव पदी विलास मडावी

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
चंद्रपूर – आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले विलास रामदास मडावी यांची ट्रायबल फोरम चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नुकतीच आमदार निवास मुंबई येथे ट्रायबल फोरमची बैठक झाली. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी ही निवड केली आहे.

 

 

ट्रायबल फोरम हे संघटन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे. वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कँडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये नियुक्ती झाल्यामुळे जिल्ह्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

 

 

या बैठकीला पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे.बुलढाणा जिल्हाध्यक्ष कासम सुरत्ने, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे, पुणे जिल्हाध्यक्ष रोहित सुपे,पुणे ट्रायबल युथ फोरमचे जिल्हाध्यक्ष विक्रम हेमाडे, पुणे विभागीय उपाध्यक्ष मारुती खामकर , इमाम केदार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here