पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथे कृषी विभागाकडुन अवैध खताच्या साठयावर धाड..

0
601

पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथे कृषी विभागाकडुन अवैध खताच्या साठयावर धाड, 2 लाख 58 हजारांचा अवैध खतसाठा जप्त

 

 

यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी/संजय कारवटकर

यवतमाळ :-  पुसद तालुक्यातील सिंगरवाडी (धानोरा) येथे यवतमाळच्या कृषी विभागाने धाड टाकली. धाडीमध्ये अवैधरित्या खताचा मोठया प्रमाणावर साठा आढळुन आल्याने एकच खळबळ माजली आहे. येथील धाडीमध्ये २ लाख ५८ हजार रूपये किंमतीचा खत साठा जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार ग्रामिण पोलीस स्टेशनच्या हददीत येत असलेल्या सिंगरवाडी येथील सेवादास कृषी केंद्रात ,”किसान गोल्ड” नावाच्य अहमदाबाद येथील प्रशांत गृपचे खताच्या २०० बॅग यवतमाळच्या कृषी विभागाने यवतमाळ जि.प.चे मोहिम अधिकारी राजेंद्र माळोदे, उपविभागीय कृषी अधिकारी पि.जी.नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी एस.आर.धुळधुळे,कृषी अधिकारी एस.के.राठोड, पुसदचे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, ग्रामिण पोलीस स्टेशनेचे चंदन जाधव, ललीत खंडापे, सिंगरवाडीचे पोलीस पाटील वि ना चव्हाण,शेतकरी मनिष उत्तम चव्हाण यांच्या समक्ष कार्यवाही करण्यात आली आहे. यवतमाळच्या कृषी विभागाला त्यांच्या सुत्रांकडुन सिंगरवाडी येथे अवैधरित्या खताचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे कृषी विभागाने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान सापळा रचून धाड टाकली. घाडीमध्ये खताच्या २०० बॅग (ज्याची किंमत २ लाख ५८ हजार) रूपयाचा आढळुन आल्याने ते जप्त केले. कृषी केंद्राचे संचालक राजेश विश्वंभर चव्हाण यांचे लहान बंधु बंटी विश्वंभर चव्हाण यांच्याकडे जप्त केलेला माल सुपुर्त करण्यात आला.

येथील सेवादास कृषी केंद्रावरील धाडीत अनधिकृत खतांचा पंचनामा करण्यात आला असुन खताचे रासायनिक विश्लेषण करण्यात येणार आहे. खताचा नमुना अमरावतीच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. येथील कृषी विभागाच्या कार्यवाहीने खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here