आवाळपूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

0
434

आवाळपूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

आवाळपुर येथील जेष्ठ नागरीक संभाजी पाणघाटे यांच्या हस्ते उद्घाटन

सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे हीच प्राथमिकता – विकास दिवे
 

नांदाफाटा/आवाळपुर : नुकतेच आवाळपूर येथील दूधडेअरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. आवाळपूर ग्रामपंचायत मार्फत झपाट्याने विविध विकास कामे करण्यात येत असून. आवाळपूर गावाच्या सरपंचा प्रियंका दिवे व उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांच्या पूढाकाराने आवाळपूर गावाला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी यशस्वी प्रयत्न होत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर अनेक विकास कामे सुरू करता आले नाही. त्यामुळे कामे प्रलंबित होते. नविन वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात कामे सुरू केली असून यावेळी आपल्या भागात सुरू असणाऱ्या विकास कामांचा दर्जा चांगला राहावा यासाठी प्रत्येक नागरीकांनी सहकार्य करावे. कामे दर्जेदार होतील यांची काळजी घ्यावी. आपल्या वयक्तिक कामाप्रमाणे या कामाकडे लक्ष द्यावे असे आवाहन सरपंच प्रियंका दिवे यांनी केले. गावात विकास कामे होण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची आहे. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी गटागटाने राजकारण बाजूला ठेवून एक दिलाने कामे केल्याने गावाचा विकास घडतो. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे हीच आमची प्राथमिकता आहे. असे व्यक्तव्य आवाळपूर ग्रामपंचायत सदस्य विकास दिवे यांनी केले. विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. विकास कामांचा शुभारंभ आवाळपूर ( दूधडेअरी ) गावाचे जेष्ठ नागरिक संभाजी पानघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आवाळपूरच्या सरपंचा प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, ग्रामपंचायत सदस्य विकास दिवे, कान्होबा भोंगळे, सुरेश दिवे, ग्रामपंचायत सदस्या सुश्मिता पानघाटे, नंदा सूर, ज्येष्ठ नागरिक अशोकजी पेटकर, विठ्ठल थेरे, भिमपाल निमगडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here