जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ओबीसींकरिता लेखा शीर्षक तयार करुन निधीची तरतूद करा – आ. किशोर जोरगेवार

0
393

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ओबीसींकरिता लेखा शीर्षक तयार करुन निधीची तरतूद करा – आ. किशोर जोरगेवार

जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आरखडा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागणी

 

 

जिल्हा वार्षिक योजनेत ओबीसींबाबत उपायोजना करण्यासाठी लेखा शीर्षक तयार करुन या विभागासाठी निधीची तरतूद करा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज आयोजीत जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आरखडा बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना केली आहे. या बैठकीत ना. अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया आदींची आभासी चल चित्र प्रणालीद्वारे उपस्थिती होती. तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गलहोत, जिल्हा नियोजन अधिकारी व्याहाड, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधिर आकोजवार यांच्यासह संबंधीत विभागाच्या अधिका-र्यांची उपस्थिती होती.

अनुसुचित जाती उपाययोजनेच्या स्वतंत्र लेखा शीर्षकासाठी 72 कोटी रुपये तर आदिवासी उपाययोजेंच्या शीर्षकासाठी 82.34 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजासाठीही लेखा शीर्षकासाठी तयार करत त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. अजित पवार यांना केली आहे. यावेळी सदर मागणीची सकारात्मक दखल घेत आज होणा-या कॅबिनेटच्या बैठकीत हा विषय मांडणार असल्याचे उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच या बैठकीत चंद्रपूर मधील प्रदुषणा बाबतही आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रश्न उपस्थित करत या गंभीर विषयाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले. चंद्रपूर जिल्हा हा औद्योगीक जिल्हा आहे. त्यामूळे वनआच्छादन असून सुध्दा हा जिल्हा प्रदुषणाच्या बाबतीत नेहमीच अग्रस्थानी राहला आहे. याचे दुष्परिणामही येथील नागरिकांच्या आरोग्यावर जाणवत आहे. वाढत्या प्रदुषणामूळे येथील नागरिकांचे आयुष्य पाच ते दहा वर्षाने कमी होत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन चंद्रपूर जिल्हाला प्रदुषणावर उपाययोजना करण्याकरिता विशेष निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. अजित पवार यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here