सेतू केंद्रात रेट बोर्ड लावून जनसामान्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी…!

0
722

सेतू केंद्रात रेट बोर्ड लावून जनसामान्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी…!

चिमूर, 20 जाने. : आज माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य प्रचार प्रमुख चिमूर तालुका पंचशील वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय चिमुर येथे तहसीलदार यांना सेतू केंद्रात रेट बोर्ड लावण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
चिमूर तालुक्यातील सेतू केंद्र विना रेट बोर्ड लावता विविध दाखले, प्रमाणपत्र काढण्यासाठी अवाढव्य पैसे जनसामान्य नागरिकांकडून वसूल करतात. त्याचे कोणतेही बिल किंवा पैसे घेतल्याचा पावती दिली जात नाही. यात जनतेची आर्थिक लूट होतांना दिसून येते.
माननीय जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी नेमून दिलेले महाऑनलाईन पोर्टल नेमून दिलेल्या ठिकाणावरून न चालता नियमाला बगल देत एखाद्या शहरी भागात किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी चालू आहे. हे सुद्धा निदर्शनास आले आहे. यामुळे या सेतू केंद्रावर कोणाचाही वचक नाही का…? हा यक्ष प्रश्न पुढे येत आहे.
यासाठी पंचशील वाळके यांनी मागील काही महिन्यांपूर्वी आपले सरकार पोर्टलवर 31/08/2021 ला तक्रार केली असता 02/02/2017 ला निवासी जिल्हाधिकारी यांनी रेट बोर्ड लावण्याचे आदेश दिले होते. असे पत्रव्यवहार करून वाळके यांना कडविण्यात आले. मात्र तहसील कार्यालय मध्ये तक्रार करून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर आम्ही तुमची तक्रार घेऊ असे आदेश वाळके यांना पत्राद्वारे देण्यात आले.

“यावरून असे सिद्ध होते की माननीय चिमुरचे तहसीलदार व सेतू विभाग याना काही कमिशन मिळते का? की झोपेचं सोंग करून बसले आहेत. असा सवाल पंचशील वाळके व अन्य नागरिक विचारत आहेत.”

निवेदन देताना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ प्रचार प्रमुख चिमूर तालुका व युवाशक्ती ग्रामविकास संघटन महाराष्ट्र राज्य जिल्हा सचिव चंद्रपूरचे पंचशील वाळके, ललित खोब्रागडे, रोहनकर, चिचमलकर, आशिष शेंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here