जिल्हा स्तरीय फेरीत प्रथम क्रमांक घेत राज्यस्तरीय फेरीकरीता प्रतीक्षा वासनिक या विद्यार्थिनीची निवड

0
410

जिल्हा स्तरीय फेरीत प्रथम क्रमांक घेत राज्यस्तरीय फेरीकरीता प्रतीक्षा वासनिक या विद्यार्थिनीची निवड

 

 

राजुरा : नेहरू युवा केंद्र ,चंद्रपूर युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय,भारत सरकार द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय भाषण प्रतियोगिता स्पर्धा एफ.ई. एस. गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत जिल्हातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. देश भक्ती और राष्ट्र निर्माण असा स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेकरीता हिंदी आणि इंग्रजी ही दोनच भाषा होती. ऐकून 29 स्पर्धक या स्पर्धेत उपस्थित होते. या जिल्हास्तरीय भाषण प्रतियोगिता स्पर्धेमध्ये श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील पदवीचे शिक्षण घेणारी प्रतीक्षा वासनिक या विद्यार्थींनीने प्रथम क्रमांक पटकावला. यासोबतच सूरज सुनील पचारे या विद्यार्थ्यांने द्वितीय क्रमांक तर प्रलय म्हशाखेत्री या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला. याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोपट भेट देऊन तिघांचाही सन्मान करण्यात आला. सदर स्पर्धेला परीक्षक म्हणून डॉ. राजेश चिमोनकर डॉ. मिनाक्षी जुमडे, अँड आकाश कडुकर उपस्थित होते. प्रतीक्षा वासनिक या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय फेरीतून राज्यस्तरीय फेरीकरीता निवड झालेली आहे. प्रतिक्षाच्या या यशाबद्दल श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड,मराठी विभाग प्रमुख डॉ. संतोष देठे, डॉ. संजय लाटेलवार, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.गुरुदास बल्की,आई-वडील मित्र परिवार यांनी कौतुक करत पुढील राज्यस्तरीय फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here