सागर झेप संस्थे तर्फे मराठी रंगभूमी दिन साजरा…
यवतमाळ, मनोज नवले
शहरातील सागर झेप संस्थे तर्फे मराठी रंगभूमी दीन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वणी नगरीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, जेष्ठ कलावंत अशोक सोनटक्के, सेवानिवृत्त शिक्षक नंदकिशोर खिरटकर यांचे हस्ते नटराज पूजन करून मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.

मागील 7 वर्षांपासून नाट्य क्षेत्राला नवीन वळण देण्याचे कार्य सागर मुने यांनी केले. त्यामुळे मला नाटक म्हणजे काय, स्पर्धा कशी असते हे समजले, असे मनोगत अशोक सोनटक्के यांनी व्यक्त केले.
नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी संस्थेचे अध्यक्ष व माझे मित्र सागर मुने अतिशय उत्तम कलावंत आहे. शालेय व महाविद्यालयात सुद्धा नाट्य कलेत तसेच सामाजिक कार्यात नेहमी मोलाचे योगदान करत असायचा असे मनोगत व्यक्त केले. संजय पिंपलशेंडे यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला नाट्य संस्थेचे सदस्य प्रवीण सातपुते, मंगेश गोहकार व संस्थेचे संस्थापक सागर मुने तसेच नागपूरचे प्रसिद्ध नाट्य कलावंत, लेखक, दिग्दर्शक ऍड. गौरव खोड उपस्थित होते.