लक्कडकोट येथील ग्राम राज भवन ठरतेय शोभेची वास्तू…!

0
495

लक्कडकोट येथील ग्राम राज भवन ठरतेय शोभेची वास्तू…!

राजुरा, (२२ सप्टें.) : राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथील ग्राम राज भवन ची दयनीय अवस्था झाली आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल के विद्यासागर राव यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून लक्कडकोट या गावाला भेट दिली. लक्कडकोट मध्ये खूप मोठा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सुद्धा उपस्थित होते. माननीय राज्यपालांनी भेट म्हणून लक्कडकोट या गावाला एक सभागृह म्हणून ग्राम राज भवन देण्याची घोषणा केली. लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधले गेलेले हे राज भवन आजघडीला शोभेची वास्तू ठरली आहे.

 

 

 

उद्घाटन अभावी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतला हस्तांतरित केले नाही. अशी चर्चा नागरिकांत आहे. तीन वर्ष उलटूनही अद्याप जनतेच्या कोणत्याही कामात आले नाही याची खंत व्यक्त केल्या जात आहे. राजभवनाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने समस्येच्या विळख्यात राज भवन अडकले आहे. राजभवनातील वस्तू चोरीला गेल्या आहेत. लक्कडकोट ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना विचारणा केली असता आमच्याकडे राज भवन हस्तांतरित झाले नाही म्हणून दूरध्वनीवर सांगितले. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग राजुरा आणि संबंधित विभागांना विनंती केली जात आहे की हे भवन दुरुस्त करून आवश्यक बाबींची पूर्तता करून ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावे, अन्यथा तुमच्या कार्यालया पर्यंत आम्हाला येण्याची वेळ येऊ देऊ नका. अशी ग्रामपंचायत प्रशासनाची मागणी आहे.

 

 

 

तत्कालीन समिती ने जे प्रस्ताव मांडले होते. समितीला पाहिजे त्या बाबी निधीच्या आराखड्यात नव्हत्या. पण हस्तांतरण झाल्यावर काही मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते. मात्र या चढा ओढीत स्थानिक जनतेचे नुकसान होते आहे. गावातील जनतेच्या कामी न येता येता सदर भवन बेवारस अवस्थेत असून अवतीभवती अस्वच्छता निर्माण झाली आहे. संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षातपणामुळे निव्वळ शोभेची वास्तू ठरत असून या बांधकामासाठी लाखो रुपयांचा निधी गुंतवला गेला आहे. राज्यपालांनी तालुक्यातील लक्कडकोट या गावाला दिलेल्या भेटवस्तूची अशी दयनीय व्यवस्था झाली असल्याने एक ना अनेक चर्चना तालुक्यात सर्वत्र उधाण आले आहे.

 

 

“ही सुशोभित ग्राम उपयोगी वास्तू असून ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात घ्यावी. काही आवश्यक बाबीच्या पूर्ततेसाठी गरजेनुसार ग्रामपंचायत प्रशासनाने प्रस्ताव द्यावा त्याचा योग्य पाठपूरावा करता येईल व मंजूर करून घेता येईल.”
आकाश बाजारे
सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राजुरा

“ग्राम राज भवन हि वास्तू ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्याचा विषय ग्रामसभेत मांडून त्याविषयी निर्णय घेण्यात येईल.”
प्रभाकर पेरकीवार
ग्रामविकास अधिकारी,
ग्रामपंचायत कार्यालय लक्कडकोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here