सुगंधित तंबाखूवर कारवाई होताच अवैध गुटखा विक्रीत वाढ

0
449

सुगंधित तंबाखूवर कारवाई होताच अवैध गुटखा विक्रीत वाढ

 

राजुरा : राज्य शासनाने मागील काही वर्षांपासून राज्यात सर्वत्र सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर प्रतिबंध लावला आहे. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता ही अतिशय योग्य कारवाई होती परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे मागील अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री सर्वत्र सुरूच होती. विशेषतः विदर्भात ही विक्री मोठ्या प्रमाणात होते.

परंतु मागील काही दिवसांपासून प्रसिद्धी माध्यमातुन ह्या विक्री विरोधात आवाज उठवण्यात आल्याने व आगामी काळातील विधानसभेचे नागपूर अधिवेशन लक्षात घेता प्रशासनातील अधिकाऱ्यांना अचानक जाग आली असून कोरपना तालुक्यात व चंद्रपूर येथे सुगंधित तंबाखू विक्रेत्यांविरोधात झालेली कारवाई लक्षात घेता राजुरा येथील सुगंधित तंबाखू विक्रेत्यांनी तंबाखू विक्री तात्पुरती बंद केली
असून ग्राहकांना काही दिवस पानठेले बंद ठेवण्यास सांगण्यात येत आहे. परंतु काही विक्रेत्यांनी ह्यावरही उपाय शोधून काढला असून तंबाखूच्या जागी आता अवैधरित्या गुटख्याची विक्री केल्या जात आहेत आणि ह्या गुटख्यासोबत सुगंधित तंबाखूचा छोटा पाऊच दिल्या जात आहे.

सुगंधित तंबाखू इतकाच गुटखा ही नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे किंबहुना तो अधिक घातक आहे.शहरातील पंचायत समिती चौक, संविधान चौक, बँक ऑफ महाराष्ट्र च्या समोरील परिसर, भारत चौक, गांधी भवन, जुने बसस्थानक, चुनाभट्टी वार्ड, तेलगु शाळेजवळील परिसर, सोमनाथपुरा, नेहरू चौक, नाका नंबर तीन,कर्नल चौक इत्यादी ठिकानी ह्या गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे परंतु राजुरा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ना सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली ना आता गुटखा विक्रेत्यांवर कुठली कारवाई केली जात आहे. ह्यावरून प्रशासणातल्या अधिकार्यांच्या ह्या अवैध विक्रेत्यांशी किती घट्ट साटेलोटे आहे हे सिद्ध होत आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या ह्या प्रवृत्तीमुळे नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे व शासनाच्या नियमांचे पण उल्लंघन होत आहे.

त्यामुळे ह्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर त्वरित कारवाईची मागणी नागरिकांनी केली असुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ह्या अधिकाऱ्यांविरोधात लोक प्रतिनिधिनी आगामी अधिवेशनात आवाज उठवावा अशीही नागरिकांची मनोभावना आहे.

नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता ही अतिशय योग्य कारवाई होती परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे मागील अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री सर्वत्र सुरूच होती विशेषतः विदर्भात ही विक्री मोठ्या प्रमाणात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here